Kolhapur News : कोल्हापूरमधील भोगावती कारखाना राड्याचे ZP निवडणूक कनेक्शन : राष्ट्रवादीच्या राहुल पाटलांच्या विरोधात काम केल्याचा निघाला राग

Bhogawati Sugar Factory clash : कोल्हापूरच्या भोगावती साखर कारखान्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन संचालकांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. राजकीय वर्चस्व आणि बदलीच्या मुद्द्यावरून तणाव वाढल्याची चर्चा आहे.
Tension escalates at Bhogawati Sugar Factory in Kolhapur as two directors clash during a board meeting amid Zilla Parishad political controversy.
Tension escalates at Bhogawati Sugar Factory in Kolhapur as two directors clash during a board meeting amid Zilla Parishad political controversy.sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Cooperative Politics : जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये विरोधात जाऊन काँग्रेसकडून उमेदवारी मिळविल्याच्या कारणावरून भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या 2 संचालकांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना सोमवारी (16 फेब्रुवारी) घडली. कामगाराच्या बदलीवरून ही हाणामारी झाल्याचे सांगितले जात होते. मात्र जिल्हा परिषदेतील राजकारण याला कारणीभूत असल्याचे आता पुढे आले आहे. संचालकांमधील असणारा वर्चस्ववाद, टेंडर या संदर्भातील अनेक कारण देखील याला कारणीभूत असल्याची माहिती समोर येत आहे.

जिल्ह्यातील सहकारी संस्थांमध्ये भोगावती सहकारी साखर कारखाना हा पहिल्यांदाच या प्रकारामुळे राजकीय पटलावर आला आहे. काँग्रेस नेते आणि दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या सहकारी साखर कारखान्यात त्यांचे चिरंजीव राहुल पाटील सध्या हे कामकाज पाहतात. राहुल पाटील यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ते राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ फिरत होते. तर त्यांच्याच कारखान्यात संचालक असलेले धीरज डोंगळे यांनी काँग्रेसकडून प्रचारात सहभाग घेतला. तर प्रा. सुनील खराडे यांनी राहुल पाटील यांची साथ दिली. त्यामुळे काही संचालकांमध्ये रोष होता.

सोमवारी (ता.16) भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत धीरज डोंगळे व प्रा. सुनील खराडे या दोन संचालकांत वादावादीचा प्रकार घडला. त्यामुळे कारखाना इमारतीत व परिसरात आज (ता.16) दिवसभर गोंधळाचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या वादावादीनंतर समर्थकांतही वादावादी वाढल्याने गोंधळात सभागृहाच्या मुख्य दरवाजाची काच फुटल्याने ती लागून 2 कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले. एका कामगाराच्या बदलीवरून हा प्रतिष्ठेचा विषय बनल्याने ही वादावादी घडल्‍याचे समोर आले.

Tension escalates at Bhogawati Sugar Factory in Kolhapur as two directors clash during a board meeting amid Zilla Parishad political controversy.
Kolhapur News : कोल्हापूर मनपात मोठा उलटफेर! पराभूत उमेदवाराची लागली 'लॉटरी', स्वीकृत नगरसेवकांची नावे निश्चित!, कोण आहेत ते नशीबवान 8 चेहरे?

काही संचालकांनी थांबविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या कारणातून हा वाद अधिक चिघळून कार्यकर्त्यांपर्यंत गेला आणि प्रधान कार्यालयातून मुख्य फाटकापर्यंत ही वादावादी वाढतच गेली. दोन संचालकांत इतक्या मोठ्या प्रमाणात वादावादीची घटना साखर कारखान्याच्या इतिहासात प्रथमच घडली. आता धीरज डोंगळे यांनी घेतलेल्या राहुल पाटील विरोधी भूमिकेतूनच हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

Tension escalates at Bhogawati Sugar Factory in Kolhapur as two directors clash during a board meeting amid Zilla Parishad political controversy.
Kolhapur Mahapalika: काँग्रेसच्या कोट्यातून ठाकरेसेनेला 'स्वीकृत' मिळाले तर आनंदच, अन्यथा सुनील मोदींचा हिशेब करणार

याबाबत संचालक सुनील खराडे म्हणाले, कौलव येथील पाणीपुरवठा संस्थेतील कामगार हा कारखान्यात स्लिप बॉय म्हणून काम करतो. त्याच्या बदलीबाबत संचालक बैठकीत चर्चा सुरू असताना धीरज डोंगळे यांनी, त्याची बदली करू नका, असे सांगून दहशत माजविणारे शब्द वापरले. तसेच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना चुकीचा संदेश देऊन बोलावून घेऊन गोंधळ घातला. मला मारहाण केल्याचा चुकीचा संदेश पसरवला असून, मला कोणतीही मारहाण झालेली नाही, असेही त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com