Kolhapur Political : कोल्हापूरमधील भाजपमध्ये जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांचा वाद अजूनही धुमसत आहे. पहिल्या वादावर पडदा पडत असताना पुन्हा एकदा नव्या वादाचा प्रत्यय आला आहे. केंद्रीय हवाईमंत्री ज्योतिरादित्य शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर भाजपचे जिल्हाप्रमुख आणि प्रदेश सरचिटणीसांना प्रवेशद्वारावरच अडवल्यानंतर त्यांच्या रागाचा पारा चांगलाच चढला.
त्यांनी विमानतळ प्रशासनावर त्याचा राग काढलाच, शिवाय मंत्र्यांचा दौरा सुरू होण्यापूर्वी विमानतळावरून रागाने निघून गेले. मंत्री ज्योतिरादित्य शिंदे शुक्रवारी 2.45 वाजता विमानतळावर येणार होते. त्यांच्या स्वागतासाठी माजी आमदार अमल महाडिक, भाजपनेते समरजितसिंह घाटगे, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, प्रदेश सरचिटणीस महेश जाधव, राजवर्धन निंबाळकर, संग्राम कुपेकर उपस्थित होते.
मंत्री शिंदे यांचे विमान उशिरा येणार असल्याचे समजताच अमल महाड़िक व समरजितसिंह घाटगे व्हीआयपी लाऊंजमध्ये गेले. थोड्यावेळाने दोन्ही जिल्हाध्यक्ष व राहुल देसाई हे लाऊंजमध्ये जात असताना पोलिसांनी त्यांना अडवले. तिघांनीही स्वत:ची ओळख करून दिली. मात्र, संबंधित पोलिसाने पत्र असेल तर आत सोडतो, असा पवित्रा घेतल्याने पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना चांगलेच धारेवर धरले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तुमचा नियम दाखवा, ज्यांना आत सोडले ते कोणत्याआधारे ? असा युक्तिवाद करीत भाजप पदाधिकाऱ्यांनी आपला राग व्यक्त केला. अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल तक्रार करण्याची धमकीच दिली. शेवटी, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने मध्यस्थी करीत लाऊंजमध्ये सोडण्याची तयारी दर्शविली. मात्र, पदाधिकाऱ्यांनी नकार देत बाहेर थांबणेच पसंत केले. या संपूर्ण प्रकारानंतर केंद्रीय हवाईमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले.
ते कोल्हापूर विमानतळाच्या नूतन इमारतीचे काम पाहण्यासाठी टर्मिनलकडे गेले. मात्र त्यांना बेदखल करीत जिल्हाप्रमुख विजय जाधव आणि प्रदेश सरचिटणीस महेश जाधव हे रागाने विमानतळावरून निघून गेले.
(Edited by Amol Sutar)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.