Kolhapur Politics : शिंदेंच्या नेत्याचे कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत संकेत, इतर नेत्यांच्या पाठिंब्याबाबतही मोठं वक्तव्य

Kolhapur City Expansion : 1942 साली कोल्हापूर नगरपालिका झाली असून तेव्हापासून शहराची हद्द आहे तीच आहे. शहराची हद्दवाढ ही नैसर्गिक आहे.
Rajesh Kshirsagar Kolhapur City Expansion
Rajesh Kshirsagar Kolhapur City Expansionsarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Corporation : कोल्हापूर शहराची हद्दवाढ अटळ आहे. त्याची प्रोसेस सुरू झाली आहे. प्राथमिक टप्प्यात आठ गावांचा समावेश होणार आहे. त्या गावांना नोटीस पाठवण्याचा सूचना आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांना देण्यात आल्या आहे. हद्दवाढीला जिल्ह्यातील सर्व नेत्यांचा पाठिंबा आहे. पण त्यांचे नाव सांगू शकणार नाही, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.

1942 साली कोल्हापूर नगरपालिका झाली असून तेव्हापासून शहराची हद्द आहे तीच आहे. शहराची हद्दवाढ ही नैसर्गिक आहे. हद्दवाढीला राजकीय विरोध असेल तर त्याला भीक घालणार नाही. गेल्या अनेक वर्षात काँग्रेसने कोल्हापूरचा विकास केला नाही. पण ग्रामीण भागातील लोकाचा विरोध असेल त्यांना विश्वासात घेवू अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

तसेच 24 आणि 26 एप्रिल रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची बैठक झाली त्यावेळी ते देखील सहमत आहे. हद्दवाढ ही माझी स्वार्थाची भूमिका नाही, तुम्ही हो का नाही? असे सांगून विरोध करावा. पण व्यक्तिगत राजेश क्षीरसागर टीका का करता? असा सवाल आमदार क्षीरसागर यांनी हद्दवाढ विरोधी समितीला यावेळी केला.

Rajesh Kshirsagar Kolhapur City Expansion
Satyajit Kadam and Rajesh Kshirsagar: सत्यजित कदमांची राज्य नियोजन मंडळावर वर्णी 'फिक्स' तर राजेश क्षीरसागरांची 'मित्रा' संस्थेवर फेरनियुक्ती!

कोल्हापूर शहरावर ग्रामीण भागातील लोड आहे. शहरातील एकरूप झालेली गावे आहेत. त्यांना सुविधा महापालिका देत आहे. या सर्व गोष्टी त्यांनी मान्य कराव्यात. ग्रामीण भागातील लोकांना सोबत घेऊन हद्दवाढ होणार आहे. आयुक्त के मंजूलक्ष्मी यांना तशा सूचना दिलेल्या आहेत. उचगाव, मोरेवाडी, पिरवाडी, सरनोबतवाडी, नवेबलिंगा, पाचगाव, नवे पाडळी, कळंबे तर्फे ठाणे या गावांचा समावेश करण्यासाठी नवा प्रस्ताव देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यांना आज हद्दवाढ संदर्भात नोटीस पाठवण्यात येणार आहे.

कोणाचे नाव सांगणार नाही

हद्दवाढ करण्यासाठी सर्वांचा पाठिंबा आहे. कोणाचा विरोध नाही. सर्व नेत्यांना त्यांची त्यांची भूमिका मांडावी लागेल. पण ज्यांचे समर्थन आहे. त्यांचे नाव जाहीर करणार नाही. पण आता हद्दवाढ अटळ आहे. कोल्हापुरातील विधान परिषदेचे काँग्रेसचे आमदार यांच्याशी देखील चर्चा झाली आहे. पण त्यांचीच भूमिका काय? हे त्यांना विचारा असे स्पष्टीकरण आमदार क्षीरसागर यांनी दिले.

Rajesh Kshirsagar Kolhapur City Expansion
Rajesh Kshirsagar : 'महाडिकसाहेब जिल्ह्यात तुमच्यापेक्षा जास्त दादागिरी कोण करणार?' क्षीरसागर म्हणाले, 'कोण आलं तर...'

थेटपाईप लाईंनचे श्रेय दुसऱ्यांनी घेतले

थेट पाईपलाईन यावी यासाठी मी आंदोलन केले. या संदर्भात मी पाठपुरावा केला. त्यासंदर्भात उपोषण देखील केलीत. परवानगीचे पत्र येणार त्याचवेळी राजकारण झालं आणि त्याचे श्रेय दुसऱ्यांनी लाटले, असाही टोला आमदार क्षीरसागर यांनी लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com