Satyajit Kadam and Rajesh Kshirsagar: सत्यजित कदमांची राज्य नियोजन मंडळावर वर्णी 'फिक्स' तर राजेश क्षीरसागरांची 'मित्रा' संस्थेवर फेरनियुक्ती!

corporations and committee appointments : मंत्रिमंडळ विस्तारानंतर महामंडळं आणि समित्या नियुक्तींमध्येही भाजपचंच वर्चस्व दिसणार.
Satyajit Kadam and Rajesh Kshirsagar
Satyajit Kadam and Rajesh KshirsagarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra government appointments : अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर रखडलेल्या महामंडळ आणि समित्यावरील नियुक्त्या होणार असल्याची माहिती आहे. या समित्यांवरील निवडीमध्ये भाजपची सर्वाधिक चलती असणार आहे. भाजपला 10, शिवसेनेला 6 तर राष्ट्रवादीला 4 या फॉर्मुलानुसार महामंडळ निश्चित होणार आहेत. अधिवेशन संपताच या नियुक्त्या केल्या जाणार आहेत.

मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शिवसेना(Shivsena) आणि राष्ट्रवादीला मिळालेली मंत्रीपदं पाहता भाजपचाच वरचष्मा या मंत्रिमंडळ विस्तारात दिसला. त्याचपद्धतीने महामंडळ आणि समित्या नियुक्तींमध्येही भाजपचंच वर्चस्व राहणार आहे. तत्पूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार राजेश क्षीरसागर यांची 'मित्रा' या संस्थेवर उपध्यक्षपदी फेरनियुक्ती केल्याने, त्यांच्याकडे असलेले राज्य नियोजनमंडळाचे अध्यक्षपद शिवसेनेचे नेते सत्यजित कदम यांच्याकडे जाण्याचा मार्ग सोपा झाला आहे.

Satyajit Kadam and Rajesh Kshirsagar
Pakistan train hijack : आता बोला! पाकिस्तानात चक्क प्रवासी रेल्वेचंच झालं अपहरण ; 400 पेक्षा अधिक प्रवासी ओलीस

2019 च्या निवडणुकीत पराभूत झालेल्या आमदार राजेश क्षीरसागर यांना महाविकास आघाडी सरकारने राज्य नियोजन मंडळाचा कारभार दिला होता. त्यानंतरच्या अडीच वर्षानंतर महायुतीने देखील त्यांचे पद कायम ठेवले. तर 2024 विधानसभा निवडणुकीत भाजपमधून(BJP) शिंदेंच्या शिवसेनेत आलेले सत्यजित कदम यांना उमेदवारी निश्चित झाली. पण ऐनवेळी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी उमेदवारी मागितली. उत्तर मतदार संघाच्या जागेवरून महायुतीत पडलेल्या ठिणगीमुळे कदम यांनी माघार घेत क्षीरसागर यांना मदत केली. त्याचवेळी नियोजनचा कारभार कदम यांच्याकडे देण्याचे ठरले होते.

सध्या राजेश क्षीरसागर(Rajesh Kshirsagar) यांच्याकडे राज्य नियोजन मंडळ आणि मित्र या संस्थेवरील उपाध्यक्ष पद आहे. मागील आठवड्यात आमदार राजेश क्षीरसागर यांची मित्र या संस्थेवर उपाध्यक्ष म्हणून पुन्हा फेरनियुक्ती करण्यात आली. एकाच व्यक्तीकडे दोन पदे देता येणार नसल्याने कदम यांचा राज्य नियोजन मंडळाचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वीच कदम यांच्याकडून नियुक्ती बाबतची सर्वच कागदपत्रे मागून घेतल्याची माहिती देखील आहे.

Satyajit Kadam and Rajesh Kshirsagar
Kanhaiya Kumar : निवडणुकीआधी बिहारमध्ये राजकारण तापलं ; कन्हैय्या कुमार सुरू करणार ''नोकरी दो, पलायन रोको'' यात्रा!

कोल्हापुरातील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीसाठी अत्यंत स्पर्धा रंगली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे कट्टर कार्यकर्ते भैय्या माने, भाजपकडून महेश जाधव यांनी देखील देवस्थानसाठी फिल्डिंग लावली आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com