Kolhapur : कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची अखेर बदली झाली आहे. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना एक वर्षाची मुदतवाढ मिळाली होती. रेखावार यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला होता. महाविकास आघाडीच्या काळापासून आत्तापर्यंत तीन मंत्र्यांवर राहुल रेखावार यांच्यामुळे दिलगीरी व्यक्त करण्याची वेळ आली होती. खुद्द मुख्ममंत्री एकनाथ शिंदे यांना रेखावार यांच्या वागणुकीचा फटका बसला होता.
एकनाथ शिंदे (Eknath shinde) हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यामुळे पत्रकार मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्यासाठी आले होते. मात्र, पत्रकारांना रेखावार 'तुम्ही बाहेर थांबला तरी चालेल', असे म्हटले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी गेटबाहेर येऊन माध्यमांशी संपर्क साधत पत्रकार परिषद घ्यावी लागली होती.
भाजपचे शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी गेले होते. त्यावेळी रेखावर यांनी माध्यम प्रतिनिधींच्या कॅमेऱ्यांना मज्जाव करत बाहेर काढण्याची भाषा वापरली. पोलिसांकडून कॅमेरा जप्त करण्याची भाषा त्यांनी वापरली होती. हे प्रकरणी तापले असता तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील ( satej patil ) यांना माध्यमांच्या समोर दिलगिरी व्यक्त करावी लागली होती.
माहितीच्या अधिकावरून एका पत्रकाराने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर एका व्हाॅट्सअप ग्रुपमध्ये त्या पत्रकारसोबत रेखावर यांनी वाद घातला. या वादग्रस्त चॅटींगमध्ये रेखावर नोटीस देण्याची धमकी वजा मेसेज करत त्या ग्रुपमधून लेफ्ट झाले. या प्रकरणी तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. दीपक केसरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर ताशेरे ओढत दिलगिरी व्यक्त केली होती.
अंबाबाई मंदिरात पत्रकारांना प्रवेश देण्याच्या सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली होती. मात्र, पालकमंत्र्यांनी आदेश देऊनही आपण या प्रकरणात 'कॉम्प्रमाइज'करणार नाही, असे म्हणत थेट पालकमंत्र्यांना आव्हान दिले होते. त्यावेळी देखील पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील जिल्हाधिकारी रेखावर यांची कान उघडणे करून माध्यमांकडे दिलगिरी व्यक्त केली होती.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.