Congress News : कोल्हापूर जिल्ह्यात सध्या काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष, लढण्यासाठी आश्वासक चेहरे; 'एकला चलो रे' ची तयारी?

Kolhapur Mahavikas Aaghadi Politics : कोल्हापूर जिल्ह्यात सध्याच्या घडीला काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांची व्यूहरचना सध्या काँग्रेसला पोषक आहे.
Kolhapur Congress
Kolhapur CongressSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील पक्षांना मिळालेल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीला लागल्याचे चित्र आहे. तर महायुतीही लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर काहीशी बॅकफूटला गेलेली महायुती पुन्हा एकदा महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत धक्का देण्यासाठी तयारीला लागली आहे.

त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात युती किंवा आघाडी होईल ना होईल, सर्वांनीच स्वतंत्र चाचपणी करून त्याचा अहवाल वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात या सर्व यंत्रणा गतिमान झालेल्या पाहायला मिळतील.

विधान परिषद निवडणूक झाल्यानंतर महायुती सरकारचा आत्मविश्वास दुणावला आहे. काँग्रेस(Congress) आणि राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ठाकरे गटाला सुरुंग लावण्याचे काम या विधानपरिषद निवडणुकीने झाल्यानंतर माहितीतील नेत्यांसमोर विधानसभा निवडणुकीचे ध्येय आहे. महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न माहिती सरकारच्या वरिष्ठ नेत्यांकडून होत आहे.

तर दुसरीकडे महाविकास आघाडी कडून अजूनही चल-बिचल सुरू आहे. विधान परिषद निवडणुकीत आमदार फुटल्याने आघाडी राहील का नाही? हे विधानसभा निवडणुकीपर्यंत पाहावे लागणार. पण सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीसह महायुतीतील सर्वच पक्षांची उमेदवारासाठी स्वतंत्र चाचपणी सुरू आहे.

Kolhapur Congress
Maharashtra Cabinet expansion : विधान परिषदेच्या निकाल लागताच राज्य मंत्रिमंडळ विस्तार? कोणाला लॉटरी लागणार?

एकीकडे निवडणुकीला सामूहिक ताकती द्वारे सामोरे जाऊन पुन्हा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न महायुतीकडून सुरू आहे. तर महायुतीला रोखून पुन्हा सत्तेवर येण्यासाठी मविआ कटिबद्ध झाली आहे. याचवेळी महायुती आणि मविआसह अन्य पक्षांकडूनही विधानसभा निवडणुकीसाठी पक्षांतर्गत मतदार संघ निहाय उमेदवारांची चाचपणी केली जात आहे.

महाविकास आघाडी मधील शिवसेना ठाकरे गटाकडून कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील स्वतंत्र उमेदवारांची यादी मातोश्रीवर पोहोचलेली आहे. प्रत्येक मतदारसंघात स्वतंत्र उमेदवाराची चाचपणी केल्यानंतर त्याचा अहवाल मुंबईत दिला आहे. रविवारी संभाव्य उमेदवारांशी चर्चा केली जाणार आहे. यासाठी संपर्कप्रमुख भास्कर जाधव हे कामाला लागल्याचे चित्र आहे.

तर शिवसेना शिंदे गटाकडून मुंबईतील पक्षनिरीक्षक शरद कणसे यांनी देखील दहा विधानसभा मतदारसंघात आढावा बैठक घेऊन संभाव्य उमेदवारांची नावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवली आहेत. सध्या तरी शिवसेना शिंदे गटाकडून शिरोळ, पन्हाळा शाहूवाडी, कोल्हापूर उत्तर, राधानगरी आणि करवीर विधानसभा मतदारसंघावर महायुतीत दावा असल्याचे सांगितले जाते.

महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटातील कार्यकर्ते 10 विधानसभा मतदारसंघात लढण्याच्या तयारीत आहेत. संभाव्य 10 उमेदवारांची नावे घेऊन जिल्हाध्यक्ष व्हीबी पाटील हे लवकरच शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेऊन आढावा देणार आहेत. जिल्ह्यातील पक्षाची स्थिती आणि परिस्थिती यावर देखील भाष्य केले जाण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगानेच आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या जाण्याची शक्यता आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात सध्याच्या घडीला काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांची व्यूहरचना सध्या काँग्रेसला पोषक आहे. त्यामुळे दहा विधानसभा मतदारसंघात लढण्यासाठी काँग्रेसकडे आश्वासक चेहरे आहेत. या मतदारसंघातील संभाव्य ड्राफ्ट यापूर्वीच तयार झाल्याचे सांगितले जाते. काँग्रेसची बैठक होऊन त्यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

Kolhapur Congress
Pankaja Munde : 'यह सिर्फ झांकी है, आता विधानसभा बाकी'; पंकजा मुंडेंनी यशाचं गणित उलगडलं !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com