Kolhapur DCC Bank: दुष्काळाचे नाव पण गोकुळच्या निकालाची धास्ती, पराभवातून सावरण्यासाठी कोल्हापूर जिल्हा बँकेची निवडणूक लांबणीवर?

Kolhapur DCC Bank Election: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या आघाडीने बाजी मारल्यानंतर कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत चर्चा सुरू झाली आहे. दुष्काळामुळे निवडणूक पुढे ढकलली जाण्याचे संकेत चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.
Kolhapur District Central Cooperative Bank election
Kolhapur DCC Bank Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur DCC Bank Election News: गोकुळ दूध संघाचा निकाल महायुतीच्या बाजूने एकतर्फी वाटत असताना ठराव धारकांनी महायुतीला धक्का दिला. बलाढ्य महायुतीला धूळ चारत आमदार सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीला बळ दिले. त्यामुळे गोकुळच्या निकालचा परिणाम जिल्हा बँकेवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विरोधातील वातावरणामुळे जिल्हा बँकेची निवडणूक तातडीने होणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. प्रत्यक्षात 'गोकुळ'ची धास्ती असली तरीही दुष्काळाचे कारण पुढे केले जाण्याची शक्यता आहे.

गोकुळ'मध्ये महायुतीकडून सत्ताधाऱ्यांची फौज होती. मुख्यमंत्री, तीन मंत्री आणि नऊ आमदार असूनही तरीही विरोधातील आमदार सतेज पाटील यांनी बाजी मारली. त्यामुळे सहकारात सध्यातरी जिल्ह्यातील राजकारणाचे वातावरण महायुतीच्या विरोधातील दिसून येत आहे. येत्या तीन नोव्हेंबर जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. तत्पूर्वी ही निवडणूक पुढे ढकलण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

जिल्हा बँकेची निवडणूक आणि 'गोकुळ'ची निवडणूक वेगळी असल्याचे यापूर्वी नेते मंडळी सांगत होते. मात्र, 'गोकुळ'मध्येही पक्षीय राजकारण आल्यामुळे पूर्वीप्रमाणेच जिल्हा बँकेची निवडणूक होईल की नाही याबाबत शंका आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बारा पैकी आठ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ नाही असे कोणीही म्हणू शकणार नाही. सध्याचे सहकारातील वातावरण महायुतीसाठी पोषक नाही याची जाणीव 'गोकुळ'च्या निवडणुकीतून झाली आहे.

Kolhapur District Central Cooperative Bank election
Devendra Fadnavis: सरकारी विभागांच्या निधीला दुष्काळाचा फटका; मुख्यमंत्र्यांकडून 20 टक्के निधी कपातीच्या सूचना

जिल्हा बँकेची निवडणूक महायुती विरुद्ध महाआघाडी अशी झाली, तर त्याचे पडसाद बँकेतही दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. अद्यापही जिल्हा बँकेची मतदार यादी पूर्ण तयार झालेली नाही. २७ ऑक्टोबरपर्यंत प्रारूप मतदार याद्यांवर हरकतीच सुरू आहेत. त्याचे अंतिम सर्व निकाल २९ ऑक्टोबरपर्यंत दिले जाणार आहेत. त्यानंतर ३ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे, असा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय सह निबंधक महेश कदम यांनी जाहीर केला आहे.

Kolhapur District Central Cooperative Bank election
Gokul: 'गोकुळ'मध्ये 'अध्यक्ष' निवडीचा नवा ट्विस्ट; पहिल्या सभेला १२ संचालक गैरहजर राहिले तरी दुसऱ्या सभेत सतेज पाटलांनाच संधी मिळणार?

दरम्यान, राज्यातील महायुतीचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे आज विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापुरात आले होते. त्यांनी दुष्काळामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुका पुढे जाऊ शकतात, असे संकेत दिले आहेत, यासाठी ज्या बँकांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली नाही, त्या बँकांची निवडणूक पुढे जाऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक पुढे जाऊ शकते, हे संकेत मिळत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com