Kolhapur Dcc Bank: कोल्हापूर जिल्हा बँकेची निवडणूक ताकदीनं लढणार, सतेज पाटलांनी 'अजिंक्यतारा'वरून शड्डू ठोकला

Mahayuti Vs Mahavikas Aaghadi News: राज्यातील महायुती सरकारमुळे बदललेल्या जिल्ह्यातील राजकीय समीकरणाचा फटका यंदा जिल्ह्याच्या राजकारणाला आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महायुती विरुद्ध आमदार सतेज पाटील असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
Satej Patil
Satej PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक कणा असलेल्या आणि सहकारतील राजकारणाच्या दृष्टीनं प्रचंड महत्त्व असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा कोणत्याही क्षणी बिगुल वाजू शकतो. गेल्या पाच वर्षात गुण्या गोविंदाने आणि वरिष्ठ गटातील निवडणुका बिनविरोध झाल्याने जिल्हा बँकेच्या राजकारणात सकारात्मक चित्र पाहायला मिळाले.

मात्र, राज्यातील महायुती सरकारमुळे बदललेल्या जिल्ह्यातील राजकीय समीकरणाचा फटका यंदा जिल्ह्याच्या राजकारणाला आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महायुती विरुद्ध आमदार सतेज पाटील असा सामना रंगण्याची शक्यता आहे. तशी घोषणा आमदार सतेज पाटील यांनी नुकताच त्यांच्या अजिंक्यतारा कार्यालयातून पक्षप्रवेशादरम्यान केली आहे.

मागील वेळी झालेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी व भाजप आघाडी विरुद्ध शिवसेना अशी चुरस पाहायला मिळाली. शिवसेनेकडून दिलेल्या एकाकी झुंजीमुळे माजी खासदार संजय मंडलिक यांनी जिल्हा बँकेतील आपले स्थान अबाधित ठेवले होते. मात्र, वरिष्ठ गटातील सेवा संस्थांच्या लढाईत 21 पैकी 6 संचालक बिनविरोध निवडून आले होते. यामध्ये मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, दिवंगत आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार राजेश पाटील, आमदार अमल महाडिक, ए. वाय. पाटील यांचा समावेश होता.

तर 15 जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी राजर्षी शाहू विकास आघाडीने 11 जागांवर विजय मिळवला होता. यामध्ये आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी आमदार राजू आवळे, आमदार विनय कोरे, सुधीर देसाई, संतोष पाटील, रणजितसिंह पाटील, भैया माने, स्मिता गवळी,निवेदिता माने,श्रुतिका काटकर,विजयसिंह माने यांचा समावेश होता.

Satej Patil
Satej Patil News: 24 तासांच्या आतच सतेज पाटलांनी घेतला मुश्रीफांचा बदला, करवीरमधून 'गोकुळ'चा मोहरा उचलला

तर विरोधी राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने 3 जागा तर अपक्ष एक जागा निवडून आली होती. माजी खासदार संजय मंडलिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, अर्जुन आबिटकर व अपक्ष रणवीरसिंह गायकवाड यांचा समावेश होता.

गेल्या पाच वर्षात जिल्हा बँकेच्या राजकारणात जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणाची नांदी पाहायला मिळाली. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या जिल्हा बँकेत राजकारणाव्यतिरिक्त एकमेकांसाठी घेतलेल्या सामंजस भूमिकेमुळे जिल्ह्याच्या राजकारणात एक सकारात्मक पायंडा पडला होता.

आता नुकतीच जिल्हा बँकेचे ठराव दाखल झाले असून कोणत्याही क्षणी जिल्हा बँकेची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. सर्वपक्षीय नेत्यांची सत्ता जिल्हा बँकेत असल्यामुळे बँकेच्या सर्वच सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळी वातावरणात पार पडले आहेत.

Satej Patil
PMC News: पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? 'लाडक्या' ठेकेदारासाठी आयुक्तांना दिलेली धमकी आमदाराला भोवणार?

राज्यातील माहिती सरकारच्या समीकरणामुळे आता जिल्ह्यातील राजकारणात वर परिणाम झाला आहे. अशातच आज गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने करवीर तालुक्यातील गोकुळचे माजी संचालक आणि दिवंगत नेते सुरेश पाटील यांचे चिरंजीव आणि गोकुळचे माजी संचालक सत्यजित पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशात दरम्यान काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी हा दौरा गोकुळचा जरी असला तर आगामी शिक्षक, पदवीधर, ठाणे जिल्हा बँकेच्या निवडणुक ताकतीने लढणार यासाठी आहे.

त्यामुळे विधानसभा आणि लोकसभेचीही पेरणी असल्याचं सांगत आगामी कोल्हापूर जिल्हा बँकेची निवडणूक लढण्यासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिलं आहे. आमदार सतेज पाटील यांच्या या भूमिकेमुळे पुन्हा एकदा मंत्री हसन मुश्रीफ हे अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेची निवडणूक गोकुळ प्रमाणे पुन्हा गाजण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com