

kolhapur: राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थाची खुलेआम विक्री होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात टपऱ्यांवर गांजा, ड्रग्ज विकले जात असल्याचा प्रश्न आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. अमली पदार्थांचे सेवन, निर्मिती, वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी अतिशय कडक कायदा करणे आवश्यक असल्याची मागणी आमदार क्षीरसागर यांनी केली.
यावेळी प्रश्न उपस्थित करताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूरात खुलेआम गांजा, ड्रग्ज विक्री होत आहे. कोल्हापूरसह राज्यामध्ये नशेचे पदार्थ खुलेआम विकले जात असल्याने युवा पिढी बरबाद होत आहे. मुलींचा नशेच्या माध्यमातून गैरवापर केला जात आहे. वाढलेल्या नशेखोरीमुळे राष्ट्र निर्माणामध्ये अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे पोलीसांच्या कारवाई सोबतच शाळा, कॉलेजमधून नशामुक्तीचे प्रबोधन होणे गरजेचे आहे.
यास उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, चित्रपटातील नशेच्या उदात्तीकरणावर यापूर्वीच सेन्सर बोर्डने आक्षेप घेतले आहेत. त्या संदर्भातील नियम तयार झाले आहेत. तथापि, अशा पद्धतीने कुठेही उदात्तीकरण होत असेल तर त्यावर तात्काळ कारवाई करता येते.
शासनाच्या सर्वच विभागांचा नशा मुक्तीचा दृष्टीकोन पाहता सार्वजनिक आरोग्य विभाग आणि सामाजिक न्याय विभाग या दोन विभागांना हेच काम दिले आहे कि त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोफत नशामुक्ती केंद्र तयार होतील, अशा पद्धतीने रचना उभी करायची आहे. त्याप्रमाणे नशामुक्ती केंद्र निश्चित केले जातील. NDPS कायद्यात सुधारणा करण्याकरिता केंद्र सरकारने कार्यवाही सुरू केली आहे. त्याप्रमाणे राज्य शासनानेही आपल्या सूचना केंद्र सरकारकडे पाठविल्या असल्याची माहिती दिली.
आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगीतले, आता त्यांची संपूर्ण साखळी शोधून संपूर्ण रॅकेट समूळ नष्ट केले जात आहे. आता कारवाई झाल्यानंतर तात्काळ गुन्हे दाखल करून जप्त केलेला नशेचा माल जाळून नष्ट केला जात आहे. अशा पद्धतीने कोट्यावधी रूपयांचे अंमली पदार्थ राज्य शासनाने नष्ट केले आहेत. यासह यामध्ये सहभागी पोलीसांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.