Dudhganga Vedganga Karkhana: के.पी. पाटलांचे बिंग फुटणार ? दूधगंगा वेदगंगा कारखान्याच्या लेखापरीक्षणाचे आदेश

Dudhganga Vedganga Sugar Factory Election : माजी आमदार आणि बिद्री कारखान्याचे चेअरमन के.पी.पाटील यांना धक्का
Dudhganga Vedganga Sugar Factory and K.P. Patil
Dudhganga Vedganga Sugar Factory and K.P. PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेल्या दूधगंगा वेदगंगा (बिद्री) सहकारी साखर कारखान्याच्या लेखापरीक्षणाचे आदेश प्रादेशिक सहसंचालक साखर आयुक्तांनी दिलेले आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे आदेश दिल्याने माजी आमदार के. पी. पाटील यांचे बिंग फुटणार असल्याची चर्चा सुरू आहे. बुधवारी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यात हे आदेश मिळाल्याने माजी आमदार आणि कारखान्याचे चेअरमन के. पी. पाटील यांना हा धक्का समजला जातो.

चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचे चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश प्रादेशिक सहसंचालक (साखर), कोल्हापूर यांनी मंगळवारी दिले असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dudhganga Vedganga Sugar Factory and K.P. Patil
Dhananjay Munde - Karuna Sharma : करुणा शर्मा २०२४ ला धनंजय मुंडेंची 'अशी' करणार अडचण...

य प्रसिद्धिपत्राकात म्हटले आहे की, बिद्री साखर कारखानाच्या मागील पाच वर्षांतील कामकाजाचे चाचणी लेखापरीक्षण करण्याची मागणी कारखान्याचे माजी संचालक दत्तात्रय उगले, अशोक फराकटे, बाबा नांदेकर व विजय बलुगडे यांनी तत्कालीन सहकारमंत्री अतुल सावे यांच्याकडे केली होती. त्यानुसार साखर आयुक्तांना लेखापरीक्षणाचे आदेश देण्यात आले होते.

या कारखान्यामध्ये केलेल्या चुकीच्या कामकाजाबाबत एकूण 17 मुद्दे उपस्थित केले होते. या अनुषंगाने करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशी अहवालामध्ये गंभीर स्वरूपाच्या बाबी उपस्थित झाल्या होत्या. त्यानुसार कारखान्यांमध्ये सुरू असलेल्या चुकीच्या कामकाजाचे लेखापरीक्षण करण्याबाबतचा प्रस्ताव विभागीय साखर सहसंचालक यांनी आयुक्त साखर यांच्याकडे सादर केला होता.

Dudhganga Vedganga Sugar Factory and K.P. Patil
Maharashtra Drought: जत तालुक्याला दुष्काळी यादीतून वगळले; संतप्त नागरिकांनी तहसीलदारांची गाडी फोडली

या प्राथमिक चौकशी अहवालास स्तगिती देण्याची मागणी सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे चेअरमन के. पी. पाटील यांनी केली होती. त्यानुसार लेखापरीक्षणास तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. या देण्यात आलेल्या स्थगिती विरोधात दाद मागण्यासाठी बिद्री कारखाना बचाव कृती समिती शासन स्तरावर प्रयत्न करत होती. या प्रयत्नांना यश आले असून, बिद्री कारखान्याचे चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश मंगळवारी विभागीय संचालक (साखर) यांना दिले आहेत.

त्यामुळे कारखान्यामध्ये झालेल्या चुकीच्या कामकाजाची सविस्तर चौकशी चाचणी लेखापरीक्षणामध्ये होणार असून, हे लेखापरीक्षण करण्याकरिता डी. बी. पाटील विशेष लेखा परीक्षक वर्ग-1 यांची नेमणूक करण्यात आली असून, त्वरित लेखापरीक्षण पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.

या चाचणी लेखापरीक्षणाची मागणी ज्येष्ठ नेते मारुतीराव जाधव गुरुजी, माजी संचालक नंदकिशोर सूर्यवंशी-सरकार, दत्तात्रय उगले, गोकुळ संचालक नंदकुमार ढेंगे, अभिजित तायशेटे, सूर्याजीराव देसाई, बाबा नांदेकर, अशोकराव फराकटे, विजय बलुगडे, शामराव भावके, विश्वनाथ पाटील, अशोकराव भांदीगरे, बाळासाहेब भोपळे आदी यांनी केली होती.

लेखापरीक्षणाच्या आदेशानंतर के. पी. पाटील काय म्हणाले?

"सत्तेचा गैरवापर करून चुकीच्या माहितीच्या आधारावर प्रशासनाला काम करण्यास आमदार प्रकाश आबिटकर भाग पाडत आहेत. मात्र, त्याला आम्ही घाबरत नाही. एक वेळ पेक्षा दहा वेळा लेखापरीक्षण करू देत, आम्ही चुकीचं काही केले नाही. लेखापरीक्षण करण्यास आम्ही विरोध करणार नाही", अशी प्रतिक्रिया माजी आमदार आणि बिद्री कारखान्याचे चेअरमन के. पी. पाटील यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली.

Edited By- Ganesh Thombare

Dudhganga Vedganga Sugar Factory and K.P. Patil
Raju Shetti : 'शेतकऱ्यांचे नुकसान होणार असेल तर...'; राजू शेट्टींचा कारखानदारांना थेट इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com