Tukaram Mundhe : चार्ज घेण्यापूर्वीच तुकाराम मुंढेंची बदली : आईच्या निधनामुळे गेले होते रजेवर, IAS विनिता सिंघल यांची पुनर्नियुक्ती

Vinita Singhal Transfer Cancelled : तुकाराम मुंढेंची दहा दिवासंपूर्वी बदली झाली होती. मात्र, विनिता वैद सिंघल यांची बदली रद्द झाल्याने मुंढे हे नव्या प्रतीक्षेच्या आहेत.
Tukaram Mundhe
Tukaram MundheSarkarnama
Published on
Updated on

Tukaram Mundhe : सनदी अधिकारी विनिता वैद सिंघल यांची बदली सामान्य प्रशासन विभागाने अवघ्या 10 दिवसांत रद्द केली आहे. त्यांना पुन्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिवपदावरच नियुक्ती देण्यात आली आहे. यापूर्वी याच पदावर तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाली होती. पण आईचे निधन झाल्याने ते चार्ज घेऊ शकले नव्हते. आता सिंगल यांची बदली रद्द झाल्याने तुकाराम मुंढे यांचीही आपोआप बदली झाली आहे.

सिंघल यांची पाच महिन्यांपूर्वीच आपत्ती व्यवस्थापनात बदली करण्यात आली होती. पण लगेचच बदली केल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. त्यांच्या जागी दिव्यांग विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंढे यांची बदली झाली होती. बदलीच्या प्रकियेदरम्यान तुकाराम मुंढे यांच्या आईचे निधन झाले होते. त्यामुळे त्यांना रजेवर जावे लागले आणि नवीप पदाचा कार्यभार घेता आला नाही.

त्याच दरम्यान, मंत्री पातळीवर वेगवान घडामोडी घडल्या आणि सिंघल यांची बदली रद्द झाली. त्यांच्याकडे जुनाच कार्यभार कायम ठेवण्यात आला. त्यांना पुन्हा त्याच विभागात कायम ठेवल्याने तुकाराम मुंढे आता नव्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. पण सिंगल यांच्या पुनर्नियुक्तीमागे कोणते 'प्रशासकीय' की 'राजकीय' गणित आहे, याची चर्चा आहे.

Tukaram Mundhe
Sadabhau Khot : २१ वर्षांच्या कारकीर्दीत २५ बदल्या! तरिही सदाभाऊ खोत म्हणतात IAS तुकाराम मुंडे ‘माहित नाहीत...’

निर्णयामागे राजकीय गणित?

तुकाराम मुंढे दिव्यांग विभागात असाताना त्यांनी धडाकेबाज निर्णय घेतले होते. त्यांची बदली झाली मात्र नियुक्तीची त्यांना आता प्रत्यक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे मुंढे यांच्या बदलीच्या आदेशाचे काय झाले आणि त्यांना आता कोणत्या विभागाची जबाबदारी दिली जाणार, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता मिळालेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com