Kolhapur Politics : जिंकणाऱ्या पैलवानांवरच खेळणार डाव...'स्थानिक'ची कुस्ती जिंकण्यासाठी 'महायुती'चा प्लॅन ठरला!

Kolhapur Politics : गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या कोल्हापूर महानगरपालिका, जिल्हा परिषदच्या निवडणुकीला सुरुवात होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्वच राजकीय पक्ष गतिमान झाले आहेत.
Kolhapur News
Kolhapur NewsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Politics : गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या कोल्हापूर महानगरपालिका, जिल्हा परिषदच्या निवडणुकीला सुरुवात होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्वच राजकीय पक्ष गतिमान झाले आहेत. आज किंवा उद्या लागेल या आशेवर राहिलेल्या इच्छुकांना दिलासा मिळाला आहे. मात्र या इच्छुकांची कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढावे? यावरून चलबिचल सुरू आहे.

राजकीय पक्षांकडून अशा मातब्बर पैलवानांना हेरून त्यांचा व्यक्तिगत सर्वे करून, त्या पैलवानाला आपल्याकडे खेचण्यासाठी डावपेच सुरू केले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे अशा इच्छुकांचा भाव चांगलाच वधारला आहे. सध्या तरी पैलवानांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतरच निर्णय घेण्याची भूमिका ठेवली आहे. तत्पूर्वी सर्वच पक्षांकडून राजकीय मेळाव्यांना सुरुवात झाली आहे.

Kolhapur News
Satej Patil : सतेज पाटलांपुढे विधान परिषद टिकवण्याबरोबरच असणार ‘ही’ तीन चॅलेंज; राजकीय दोस्तीतील फूट ठरणार अडचणीची

गेल्या साडेचार वर्षांपासून ही निवडणूक रखडल्याने अनेक इच्छुक आतापासूनच तयारीला लागले आहेत. आर या पार या भावनेने मैदानात उतरलेल्या अशा पैलवानांनी राजकीय पक्षांचा आधार घेण्यापेक्षा स्वतःच मतदारांच्या गाठीभेटीवर लक्ष दिले आहे. त्यामुळे मागील 10 वर्षांपासून तयारीत असलेल्या या इच्छुकांचं मतदारसंघात प्राबल्य अधिक आहे. राजकीय पक्षांची वाढती भाऊ गर्दी आणि मतदारांच्या वाढलेल्या अपेक्षा यामुळे इच्छुकांची देखील कसोटी लागणार आहे. त्यांना देखील राजकीय पक्षाचा आधार घेतल्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती आहे. मात्र जो पक्ष आपल्याला सर्वतोपरी मदत करेल, त्यातूनच निवडणूक लढवण्याची भूमिका अशा पैलवानांनी घेतली आहे.

आपल्या पक्षाकडून निवडणूक लढवायला लावायची की स्वतंत्र लढ दे याबाबत अभ्यास करण्यासाठी भाजपने पाच सदस्यांची समिती नियुक्त केली आली आहे. संबंधित उमेदवाराचे मतदारसंघात असलेले प्राबल्य, जनसंपर्क, उमेदवाराची ताकद या संदर्भात ही समिती अभ्यास करणार आहे. त्याबाबतची पहिली प्रक्रिया यापूर्वी झाली आहे. लवकरच उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपचा जिल्हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यातच एकत्र लढण्याचे किंवा स्वतंत्र्य लढण्याचा निर्णय होणार आहे. मात्र ज्या मतदार संघात तिढा कायम आहे त्या मतदारसंघात स्वतंत्र लढण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.

Kolhapur News
Kolhapur News : धनंजय महाडिकांचा 'प्लॅन' अजित पवार-मुश्रीफांनी हाणून पाडला; गोकुळमध्ये सतेज पाटलांसोबतची मैत्री कायम राहणार

महायुतीमधील राष्ट्रवादीची तयारी यापूर्वी झाली. मतदारसंघात जिंकून येण्यासारख्या 25 उमेदवारांची यादी राष्ट्रवादीकडे तयार आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत रविवारपर्यंत या संदर्भातील बैठक होणार आहे. शिवसेनेकडून देखील अशा मातब्बर उमेदवारांची शोध मोहीम सुरू आहे. आजी-माजी नगरसेवकांना देखील आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिवाय मतदार संघात ताकदवर असलेल्या उमेदवाराचा शोध देखील शिंदेंच्या शिवसेनेकडून सुरू आहे. एकूणच जिंकण्याऱ्या उमेदवारावरच डाव लावून कुस्ती जिंकण्याचा प्रयत्न महायुतीतील तिन्ही पक्षांचा असल्याचे दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com