Lok Sabha Election 2024 : आतापासून अतिउत्साह दाखवू नका; ठाकरेंनी बजावले

Shiv Sena : निवडणुकीसाठी इच्छुक आणि ‘भावी’चा प्रचार करणाऱ्यांची ‘मशाल’ विझवली
Uddhav Tahckeray
Uddhav TahckeraySarkarnama
Published on
Updated on

Vidarbha Politics : महाविकास आघाडीमध्ये असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटातील काही अतिउत्साही नेत्यांची ‘मशाल’ उद्धव ठाकरे यांनी विझविली आहे. उगाच भावी खासदार, भावी आमदार अशी फालतू पोस्टरबाजी, बॅनरबाजी आणि प्रचार करू नका, अशी सक्त ताकीद विदर्भातील नेत्यांना देण्यात आली आहे.

लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप कोणत्याही पक्षाने जागावाटप अथवा उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा केलेली नाही. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह सुमारे 40 आमदार व खासदार बाहेर पडले. त्यामुळे अनेकांना आता आपली लोकसभेतील व विधानसभेतील ‘लाइन क्लिअर’ झाल्याचे वाटत आहे. या नेत्यांनी आता ‘भावी खासदार’, ‘भावी आमदार’ असा प्रचार सुरू केला आहे.

Uddhav Tahckeray
Lok Sabha Election 2024 : बुलढाण्याच्या जागेवरून शिवसेना-भाजपात ओढाताण कायम

नेत्यांच्या या प्रचारामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटात तर संभ्रम निर्माण झाला आहेच, शिवाय महाविकास आघाडीमध्येही तणातणी निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे यासंदर्भात ठाकरेंनी विदर्भातील अनेक नेत्यांचे कान टोचले आहेत. शिवसेना महाविकास आघाडीत आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. आपण कोणालाही खासदारकी किंवा आमदारकीसाठी शब्द दिलेला नाही. अशात ‘उगाच हरीकराव बनू नका!’ अशी तंबीच ठाकरे यांनी नेत्यांना दिली आहे.

विदर्भात काही ठिकाणी नेत्यांनी स्वत:च खासदारकी आणि आमदारकीसाठी प्रचार सुरू केला आहे. शिवसेनेकडून कोणाचेही नाव उमेदवारीसाठी ‘फायनल’ झालेले नाही. असे असतानाही विदर्भात प्रचाराला झालेला शुभारंभ उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीला ही बाब चांगलीच खटकली आहे. शिवसेनेने कोणत्याही लोकसभा मतदारसंघांचे उमेदवार निश्चित केले नाहीत. महाविकास आघाडीतील घटकपक्ष आणि शिवसेनेतील नेत्यांशी चर्चा केल्यानंतरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उमदेवारांच्या नावांची घोषणा करणार आहेत. तोपर्यंत अतिउत्साह दाखवू नका, असे आदेशही मुंबईतून धडकले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्यासाठी इच्छुक आपलीच उमेदवारी पक्की असल्याचा जनतेत प्रचार करीत आहेत. कुणाचीच उमेदवारी अंतिम झाली नसून संभ्रम निर्माण करू नये, अशी तंबी दिल्याने शिवसेना ठाकरे गटातील इच्छुकांची चांगलीच कोंडी झाली आहे. जिथे लोकसभा निवडणुकीसाठीच शिवसेनेने नावांवर शिक्कामोर्तब केलेले नाही, अशात अद्याप प्रतीक्षा असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठीही गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्यांनी व्यापक प्रचार सुरू केला आहे. त्यातील अनेकांनी अमुक विधानसभा मतदारसंघाचा चेहरा, भावी आमदार म्हणून पोस्टही व्हायरल केल्या आहेत. त्यावरही उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे.

Edited by : Prasannaa Jakate

R...

Uddhav Tahckeray
Lok Sabha Election 2024 : शिवसंकल्प यात्रेतून शिंदे गट उडविणार प्रचाराचा धुराळा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com