Kolhapur Lok Sabha : कोल्हापुरात दुरंगी तर हातकणंगलेत चौरंगी लढत; हे उमेदवार असणार रिंगणात

Kolhapur News : कोल्हापूर मतदारसंघात 23 उमेदवार रिंगणात आहेत. येथे काँग्रेसचे शाहू महाराज छत्रपती आणि शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे आपली बंडखोरी कायम ठेवत अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.
Kolhapur News
Kolhapur News Sarkarnama

Kolhapur Lok Sabha Candidate : कोल्हापूर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानही पार पडले आहे. त्यातच कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील अर्ज माघारीचा दिवस काल पूर्ण झाला.

या दिवसात कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात नऊ उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याने राजकीय लढत स्पष्ट झाली. कोल्हापुरातून चौघांनी, तर हातकणंगलेतून पाच जणांनी माघार घेतली. Loksabha Election Updates

कोल्हापूर मतदारसंघात 23 उमेदवार रिंगणात आहेत. येथे काँग्रेसचे शाहू महाराज छत्रपती Shahu Maharaj Chhatrapati आणि शिवसेनेचे संजय मंडलिक Sanjay Mandlik यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे आपली बंडखोरी कायम ठेवत अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. latest News Maharashtra Politics

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या प्रमुख उमेदवारांनी घेतली माघार

कोल्हापूर मतदारसंघातून Kolhapur Constituency माजी आमदार युवराज मालोजीराजे छत्रपती, तर खासदार संजय मंडलिक Sanjay Mandlik यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक, रूपा वायदंडे आणि राहुल लाड Rahul Lad यांनी माघार घेतली. दलित महासंघाच्या रूपा वायदंडे यांनी माघार घेऊन महाविकास आघाडीचे MVA उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा दिला. तर हातकणंगले मतदारसंघात अपक्ष उमेदवार धैर्यशील संभाजीराव माने (सेम नावाचा व्यक्ती आहे) वेदांतिका धैर्यशील माने, बाबासाहेब यशवंत पाटील, शिवाजी विठ्ठल माने आणि सुनील विलास अपराध यांनी माघार घेतली. Current News about Maharashtra Politics

Kolhapur News
Nashik constituency 2024 : हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला मुख्यमंत्री शिंदे यांचा ग्रीन सिग्नल ?

कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार आणि चिन्ह

  • श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (काँग्रेस-हाताचा पंजा)

  • संजय मंडलिक (शिवसेना-धनुष्यबाण)

  • संजय मागाडे (हत्ती)

  • संदीप कोगले (बॅट)

  • बसगोंडा पाटील (भेटवस्तू)

  • अरविंद माने (कॅरमबोर्ड)

  • शशीभूषण देसाई (रोड रोलर)

  • सुनील पाटील (गॅस सिलिंडर)

  • संतोष बिसुरे (सीसीटीव्ही कॅमेरा)

  • इरफान चांद (हिरवी मिरची)

  • कुदरतुल्ला लतीफ (शिवणयंत्र)

  • कृष्णा देसाई (हिरा)

  • बाजीराव खाडे (ऊस शेतकरी)

  • नागनाथ बेनके (शिट्टी)

  • माधुरी जाधव (प्रेशर कुकर)

  • मुश्ताक मुल्ला (दूरदर्शन)

  • मंगेश पाटील (इस्त्री)

  • ॲड. यश हेगडे-पाटील (कोट)

  • राजेंद्र कोळी (किटली)

  • सलीम बागवान (अंगठी)

  • सुभाष देसाई (लिफाफा)

  • संदीप संकपाळ (बॅटरी टॉर्च)

हातकणंगले मतदारसंघातून 27 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने Dhairyashil Mane, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सत्यजित पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी Raju Shetti आणि वंचित बहुजन विकास आघाडीचे डी. सी. पाटील D. C. Patil यांच्यात प्रमुख लढत होणार आहे.

याशिवाय भारत जवान किसान पक्षाचे रघुनाथदादा पाटीलही रिंगणात आहेत. निवडणूक रिंगणात उमेदवारांची निश्चिती झाल्याने आता प्रचारात रंगत येणार आहे. आतापर्यंत धूसर असणारे राजकीय चित्र स्पष्ट झाले असून, प्रमुख उमेदवारांवरून निवडणुकीतील लढत निश्चित झाली आहे.

Kolhapur News
Kolhapur Political News : राधानगरीत नेत्यांचे मनोमिलन; कार्यकर्ते मात्र संभ्रमात

हातकणंगले लोकसभेचे उमेदवार व चिन्ह

  • रवींद्र कांबळे (हत्ती)

  • धैर्यशील माने (शिवसेना-धनुष्यबाण)

  • सत्यजित पाटील आबा सरुडकर (शिवसेना ठाकरे गट- मशाल)

  • राजू शेट्टी (शिट्टी)

  • डी. सी. पाटील (वंचित - प्रेशर कुकर)

  • इम्रान खतीब (खाट)

  • डॉ. ईश्वर यमगर (ट्रिलर)

  • दिनकरराव चव्हाण (सिंह)

  • धनाजी गुरव (रिक्षा)

  • रघुनाथदादा पाटील (भेटवस्तू)

  • शरद पाटील (गॅस सिलिंडर)

  • संतोष खोत (नारळाची बाग)

  • अस्लम मुल्ला (चिमणी)

  • आनंदराव सरनाईक (बॅटरी टॉर्च)

  • जावेद मुजावर (फुगा)

  • लक्ष्मण डवरी (अंगठी)

  • लक्ष्मण तांदळे (हिरा)

  • परशुराम माने (सफरचंद)

  • मनोहर सातपुते (स्पॅनर)

  • महंमद दरवेशी (एअर कंडिशनर)

  • अरविंद माने (कॅरम बोर्ड)

  • देवेंद्र मोहिते (ट्रक)

  • राजेंद्र माने (दूरदर्शन)

  • रामचंद्र साळुंखे (कपाट)

  • शिवाजी संकपाळ (बॅट)

  • सत्यजित पाटील(माईक)

  • आनंदराव थोरात (किटली)

  • R

Kolhapur News
Narendra Modi news : पंतप्रधान मोदींची 28 एप्रिलला कोल्हापुरात सभा, तपोवनात येणार भगवं वादळ !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com