Narendra Modi News : मोदींच्या सभेसाठी दिल्लीची यंत्रणा सतर्क; 12 किलोमीटर परिसरात कडेकोट बंदोबस्त !

Kolhapur Lok Sabha Constituency : जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षकांसोबत चर्चा करून योग्य ते नियोजन करण्याबाबत केली चर्चा ...
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama

Kolhapur Political News : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी शनिवारी २७ एप्रिलला कोल्हापूर येथे येणार आहेत. तेथे त्यांची जाहीर सभा होणार असल्याने या सभेसाठी भारतीय जनता पक्षाची तसेच शासकीय पातळीवरील सर्वच यंत्रणा सतर्क झाली आहे.

या सभेसाठी कोल्हापुरात खास दिल्ली येथील यंत्रणा सक्रिय झाली आहे. कोल्हापूर विमानतळ ते सभास्थान असलेले तपोवन मैदान या बारा किलोमीटर अंतरावरील सर्वच अडथळे दूर करण्यात येणार आहेत. याचे नियोजन करण्यासाठी तसेच व्हीआयपी पासेस, मंडप उभारणीसह अन्य नियोजनांच्या बैठकांनी कोल्हापुरात शुक्रवारी जोर धरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर प्रचार सभा शनिवारी (ता. 27) होत आहे. त्यासाठी तपोवन मैदानावर मंडप उभारणीसाठी सर्व साहित्य उतरले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Modi
Rajesh Kshirsagar News : क्षीरसागरांनी राजघराण्याची दुखती नस दाबली, कोल्हापूरच्या राजकारणात 'कदमबांडे' नावाची एन्ट्री

विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनीही आज राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला. जिल्हाधिकारी, (Collector) महापालिका आयुक्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षकांसोबत (PWD) चर्चा करून योग्य ते नियोजन करण्याबाबत चर्चा केली.

विमानतळापासून तपोवन मैदानापर्यंत पंतप्रधान मोटारीने दाखल होणार आहेत. या परिसरातील सर्व अडथळे दूर करण्याच्या सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या आहेत. शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी आज कोल्हापुरात दाखल झाले आहेत. त्यांच्याही बैठका सुरू आहेत. नियोजनात कोणतीही चूक राहणार नाही, यासाठी सूक्ष्म पद्धतीने आखणी केली जात आहे.

दरम्यान, व्हीआयपी पासेस, व्यासपीठावरील मान्यवरांची नावे, भाषणातील क्रम, मतदारांना उपस्थित राहण्यासाठीची व्यवस्था याचेही काम भारतीय जनता पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या मार्फत सुरू झाले आहे. यासाठी वेगवेगळ्या पातळींवर चर्चा, बैठका सुरू झाल्या आहेत. शुक्रवारी सायंकाळी खासदार धनंजय महाडिकसुद्धा तपोवन मैदानाची पाहणी करणार आहेत.

Narendra Modi
Solapur Lok Sabha 2024 : मोदी-ठाकरे-पवारांची सोलापूरमध्ये एकाच दिवशी होणार सभा

पोलिसांनी केली आज पाहणी

महायुतीची जाहीर सभा शनिवारी (ता. 27) सायंकाळी पाच वाजता तपोवन मैदानावर होत आहे. येथे उभारण्यात येणाच्या मंचाची पाहणी पोलिस प्रशासनाकडून आज केली. अपर पोलिस महासंचालक सुखविंदर सिंग यांनीही पाहणी केली आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

R

Narendra Modi
Udayanraje Bhosale: यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, उदयनराजे घालणार मोदींना साकडं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com