Kolhapur news : अब्जावधीपेक्षा नगरसेवकांना 3 कोटींचं दुःख, दम नव्हता तर सभा घेतली कशाला?

Kolhapur Municipal Corporation, Kolhapur Municipal Meeting, General Body Meeting, Meeting Adjourned : नगरसेवकांना जर तीन कोटी गेल्याचे दुःख आणि संताप करण्याचं धाडस येत असेल तर सभा तहकूब होण्यामागे अन्य कारण असल्याचेही आता समोर येत आहे.
Kolhapur Municipal Corporation
Kolhapur Municipal CorporationSarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur Politics : कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी तहकूब करण्यात आली. कोल्हापुरात जकात वसुलीचा ठेका घेतलेल्या कंपनीबरोबर झालेल्या न्यायालयीन लढाईत अधिकाऱ्यांनी सेटलमेंट केली. इतकेच नव्हे तर नऊ महिन्याच्या कालावधीत प्रशासनाकडून एक रुपयाचा निधी दिला नाही. जकात नाक्याचा प्रश्न न्यायालयाच्या निकालानंतर तात्काळ कारवाई न केल्याने फेअर डील कंपनीने महानगरपालिकेचे तीन कोटी लाटले असल्याचा आरोप करत नगरसेवकांनी सभा तहकूब केली.

वास्तविक सभा तहकूब करण्यामागे अन्य कारण दडले आहे. जर नगरसेवकांना तीन कोटी गेल्याचे दुःख आणि संताप येत असेल तर गांधीनगर अतिक्रमण प्रश्नावर ही सभा होणे आवश्यक होते. सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधकांनी देखील तलवार म्यान केल्याने सभा तहकूब करण्यामागचं गौडबंगाल काय? असा प्रश्न कोल्हापूरकरांना पडला आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या सुरुवातीलाच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि नगरसेवक जयंत पाटील यांनी 14 नोव्हेंबर 1915 ते 31 ऑक्टोंबर 1996 या वर्षाच्या कालावधीसाठी शहरातील जकात वसुलीचे काम फेअर डील कंपनीला दिले असल्याचे सांगत हे काम 24 कोटी सहा लाख रुपयासाठी मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली. मात्र जकात वसुलीवरून कोल्हापूर शहरात रोष निर्माण झाल्यानंतर हा करार महापालिकेने रद्द केला.

Kolhapur Municipal Corporation
Supreme Court news : ZP, पंचायत समित्यांसाठी महत्वाची बातमी; मतदारसंघ आरक्षणाच्या रोटेशनवर सुप्रीम कोर्टाचे शिक्कामोर्तब, सरकारला दिलासा

कंपनीने न्यायालयात त्याला आव्हान दिले होते. लवादाकडून या कंपनीला 1997 पासून तब्बल 18% व्याज देत महापालिकेने कंपनीला 122 कोटी द्यावेत असे आदेश दिले होते. त्यानंतर नगरसेवक सुनील मोदी यांनी पुढील माहिती देत सर्व घटनांचा संदर्भ देत महापालिकेकडून भरण्यात आलेली तीन लाखांची डिपॉझिट निकालानंतर फेअर डील कंपनीने काढून घेतली असल्याचा गौप्यस्फोट केला. या प्रकारामुळे सभागृहाला कोणतीच माहिती न देता तीन कोटी गेल्याचे दुःख आणि नगरसेवकांनी संताप व्यक्त करत सहभाग तहकूब करण्याची मागणी केली.

नगरसेवकांचा आक्रमकपणा आणि अधिकाऱ्यांवर व्यक्त केलेला संताप पाहून अन्य नगरसेवक देखील खुर्चीवरून उठून या गोष्टीचा निषेध केला. तर एका नगरसेवकाने तहकूब म्हटल्यानंतर सभागृहातील प्रमुख महापौर यांनी देखील खुर्चीवरून उठून सभा तहकुब झाल्याचे संकेत दिले. स्वाभाविकच महानगरपालिकेला तीन कोटीचा फटका बसल्याचे सांगत नगरसेवक यांनी संताप व्यक्त करणे योग्य होते.

Kolhapur Municipal Corporation
RBI News : रिझर्व्ह बँकेचा 63 फायनान्स कंपन्यांना दणका; थेट परवानाच रद्द, महाराष्ट्रातील कंपन्यांचाही समावेश

नगरसेवकांना जर तीन कोटी गेल्याचे दुःख आणि संताप करण्याचं धाडस येत असेल तर सभा तहकूब होण्यामागे अन्य कारण असल्याचेही आता समोर येत आहे. महापालिकेत सर्वसाधारण सभा होणार, हे जवळपास निश्चित असताना कोल्हापूर शेजारील असलेल्या गांधीनगर परिसरातील 158 एकर जागेवरील अतिक्रमण आणि 204 बेकायदेशीर अतिक्रमणावर आवाज उठवणे अपेक्षित होते. या मिळकतीची बाजारात अंदाजे अब्जावधीची किंमत आहे. त्यामुळे तीन कोटीपेक्षा एकाही नगरसेवकाला किंवा राजकीय पक्षाच्या नेत्यांना गांधीनगर अतिक्रमणाचा प्रश्न महत्त्वाचा का वाटला नाही?

कोल्हापूर महानगरपालिकेचे अब्जावधीचे नुकसान या नगरसेवकांना दिसले नाही का? शिवाय सभा तहकूब करणे ऐवजी सत्ताधाऱ्यांना या प्रश्नावर धारेवर धरण्याचं धाडस विरोधकांमध्ये का आले नाही? सभेत या संबंधित ठराव नसेल तर ऐनवेळी प्रश्न उपस्थित करून त्यावर चर्चा घडवून आणण्याचं धाडस नव्हते का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जर गांधीनगर प्रश्नावर सभागृहात प्रश्न उपस्थित करण्याचा दम नसेल तर सभा घेतली कशाला अशी चर्चा आता शहरवासियामध्ये होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.