Kolhapur mayor : कोल्हापूरमध्ये महापौरपदाची खांडोळी : 5 वर्षात तब्बल 6 जणांना संधी देण्याचा प्लॅन, तेवढेच उपमहापौर अन् स्थायी समितीचे अध्यक्ष

Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर महापालिकेत महायुतीने सत्तावाटपाचा फॉर्मुला निश्चित केला असून पाच वर्षात सहा महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती मिळणार आहेत.
Senior BJP and Shiv Sena leaders attend a crucial Mahayuti meeting in Kolhapur to finalise the mayor, deputy mayor and standing committee power-sharing formula.
Senior BJP and Shiv Sena leaders attend a crucial Mahayuti meeting in Kolhapur to finalise the mayor, deputy mayor and standing committee power-sharing formula.Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Mahapalika : कोल्हापूर महानगरपालिकेवर महापौरपदासाठी सर्वात पहिला कोणता पक्ष दावा करणार याची उत्सुकता संपूर्ण शहरवासीयांना लागली होती. मात्र शनिवारी झालेल्या महायुतीच्या वरिष्ठ मंत्र्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये या संदर्भातील फॉर्मुला निश्चित करण्यात आला आहे. या फॉर्मुलानुसार कोल्हापूर महानगरपालिकेला 5 वर्षात तब्बल 6 महापौर मिळणार आहेत.

तर उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती पद देखील 6 मिळणार आहेत. त्यामुळे कोणताही कार्यकर्ता आणि पदाधिकारी नाराज होणार नाही याची खबरदारी महायुतीच्या सर्वच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी घेतलेली दिसते. दरम्यान मंत्री हसन मुश्रीफ हे कोल्हापुरात आल्यानंतर या फॉर्मुलावर शिक्कामोर्तब होणार आहे.

महानगरपालिकेतील पदाधिकारी निवडीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या नेत्यांची शनिवारी (31 जानेवारी) कोल्हापुरात बैठक झाली. मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांची बैठक झाली.

राष्ट्रवादीचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ हे मुंबईत असल्यामुळे त्यांना या संदर्भातील सगळी माहिती देण्यात आली. मुश्रीफ हे रविवारी, एक फेब्रुवारी रोजी कोल्हापुरात येणार आहेत. रविवारी पुन्हा एकदा महायुतीच्या नेते मंडळींची बैठक होणार आहे.

Senior BJP and Shiv Sena leaders attend a crucial Mahayuti meeting in Kolhapur to finalise the mayor, deputy mayor and standing committee power-sharing formula.
Kolhapur Municipal Corporation : महायुतीचा 'तो' फॉर्म्युला फिक्स? कोल्हापूर महापालिकेत भाजप-सेना युतीचे नवे राजकीय गणित!

भाजपला कोणती पदे, शिवसेनेला कोणती पदे आणि राष्ट्रवादीला कोणती पदे यासबधी चर्चा झाली. राष्ट्रवादीचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ हे सध्या मुंबईत आहेत. त्यामुळे त्यांना या बैठकीतील चर्चेची सगळी माहिती देण्यात आली. मंत्री मुश्रीफ हे रविवारी कोल्हापुरात येणार आहेत. मंत्री मुश्रीफ कोल्हापुरात आल्यानंतर पुन्हा एकदा महायुतीच्या नेते मंडळींची बैठक होणार आहे. त्या बैठकीत फार्मुल्यावर शिक्कामोर्तब होईल. त्यानंतर त्याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. दरम्यान हॉटेल अयोध्या येथे झालेल्या बैठकीवेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे समित कदम यांनी मंत्री पाटील यांची भेट घेतली.

Senior BJP and Shiv Sena leaders attend a crucial Mahayuti meeting in Kolhapur to finalise the mayor, deputy mayor and standing committee power-sharing formula.
Kolhapur Mahapalika: महापालिकेत गटनेता ठरला! भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीसह काँग्रेसने दिला अनुभवी चेहरा

दरम्यान कोल्हापूर महानगरपालिकेत या पाच वर्षात सहा वेळा महापौर पद दिले जाणार आहे. पहिल्या अडीच वर्षात दोन वेळा भाजपला तर एक वेळ शिवसेनेला, तर दुसऱ्या अडीच वर्षात दोन वेळा शिवसेनेला तर एक वेळ भाजपला असे हे पद दिले जाणार आहे. मात्र पहिल्यांदा भाजपचा महापौर होईल असे चित्र दिसते. याच पद्धतीने उपमहापौर पद आणि स्थायी समिती पद असणार आहे. मात्र एक वेळचे स्थायी समिती पद हे राष्ट्रवादीला जाण्याची शक्यता आहे. तर उपमहापौर पद हे जनसुराज्य शक्तीला जाण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com