Kolhapur Mahayuti Politics : महापौर आमचाच! कोल्हापूर महायुतीत रस्सीखेच, तर पक्षांतर्गत वाद मिटवण्याचे वरिष्ठांसमोर आव्हान

Kolhapur Mahayuti Internal Disputes : महायुतीत मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होत असताना तिन्ही पक्षांकडून कोल्हापूरच्या महापौर पदावर दावा केला जात आहे.
Mahayuti Politics
Mahayuti PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 12 Aug : दिवाळीनंतर कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीला वेग येणार आहे. सध्या महाविकास आघाडीमधील वातावरण थंड असले तरी महायुती निवडणुकीबाबतीत बरीच पुढे गेली आहे. भाजप, शिवसेना, आणि राष्ट्रवादीत महायुतीतील नाराजांची संख्या वाढली आहे.

महायुतीत मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होत असताना तिन्ही पक्षांकडून कोल्हापूरच्या महापौर पदावर दावा केला जात आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक अजून लांब असली तरी आतापासूनच बेरजेचे राजकारण गृहीत धरत महापौर पदावर तिन्ही पक्षांनी दावा केला आहे.

यासाठी जणू स्पर्धाच महायुतीत लागली आहे. पण प्रत्येक पक्षातील अंतर्गत मतभेद वाद महापौर पदासाठी अडचणीचे ठरू शकतात. त्यासाठी अंतर्गत मतभेद मिटवण्याचा आव्हान महायुतीपुढे आहे. ओबीसी आरक्षणाच्या प्रकरणामुळे गेल्या चार वर्षांपासून कोल्हापूर महापालिकेची निवडणूक रखडली आहे. जवळपास एक सभागृह कालावधीचा अवधी यामध्ये खर्च झाला.

महापालिकेला ना नगरसेवक मिळेना ना महापौर, अशी अवस्था झाली आहे. शिवाय प्रत्येकाच्या राजकारणातील चार वर्षे वाया गेल्याने आता नगरसेवक आणि महापौर होण्याची घाई लागली आहे. आपल्याच पक्षाकडे महापौर पद असावे असा प्रत्येक पक्षाचा प्रयत्न आहे.

Mahayuti Politics
Eknath Shinde Faction: एकनाथ शिंदे गटात अस्वस्थता; महापालिका निवडणुकीत भाजप ऐनवेळी शिंदे पक्षाला वाऱ्यावर सोडणार?

सर्वोच्च न्यायालयाकडून 27% ओबीसी आरक्षणावरच निवडणुका घेण्याच्या सूचना आल्यानंतर दिवाळीनंतरच महापालिकेच्या निवडणुकीचा मुहूर्त लागणार आहे. राज्यात महायुती म्हणून महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याचे ठरले असताना कोल्हापूर जिल्ह्यात मंत्र्यांचे दौरे वाढले आहेत.

अशातच भाजपकडून घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर महापालिकेवर भाजपचा महापौर करावा अशा सूचना कार्यकर्त्यांना केल्या आहेत. तर राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी देखील महापौर भाजपचाच होणार असा दावा छातीठोकपणे केला आहे.

दुसरीकडे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या बैठकीत कोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकवा आणि महापौर शिवसेनेचाच करा अशा सक्त सूचना शिवसैनिकांना दिल्यात. तर तिकडे राष्ट्रवादीची कासवाची चाल असून महापालिकेवर राष्ट्रवादीचाच महापौर करणार अशी शपथ मंत्री हसन मुश्रीफांनी घेतली आहे.

Mahayuti Politics
BJP Mahayuti Financial Crisis: नऊ महिन्यांपासून आमदारांना एक रुपयाही नाही; निधीसाठी मंत्रालयात हेलपाटे...

महापौर पदावर तिन्ही पक्षाकडून दावा केला जात असला तरी पक्षा पक्षातील अंतर्गत मतभेद आजही कायम आहेत. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या अधिक आहे. मात्र जुन्या नव्या भाजप इच्छुकांच्या वादाचे ग्रहण अद्याप संपलेले नाही. सुरुवातीला महापालिका निवडणुकीची जबाबदारी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्यावर सोपवली होती.

त्यानंतर यंत्रणा अधिक गतिमान करण्यासाठी राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना पुण्यातून कोल्हापुरात येऊन मिळावा घ्यावा लागला. त्यानंतर ही यंत्रणा गतिमान झाली. एकूणच समन्वयाचा अभाव भाजपमध्ये जुन्या नव्या वादात अडकलेला दिसल्याचे स्पष्ट होत आहे.

शिवसेनेतील परिस्थिती पाहता शिवसेनेकडे इच्छुकांचा ओढा जास्त आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून इच्छुकांना अधिक वेळ मिळत असल्याने अनेकांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. तर यापुढे देखील पक्षप्रवेश होणार आहेत. पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर त्यांच्या माध्यमातून इच्छुकांना गळ घालण्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे.

मात्र, येणाऱ्या इच्छुकांची कोंडी अंतर्गत मतभेदामुळे अधिक होत आहे. पालकमंत्री आबिटकर यांच्या माध्यमातून आलेल्या नगरसेवकांना आमदार क्षीरसागर यांचा ग्रीन सिग्नल असला तरच त्यांना पक्ष प्रवेश दिला जात असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. शहरातील नेतृत्व म्हणून क्षीरसागर महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष केंद्रित करण्याचे काम सुरू आहे.

काही नगरसेवकांचा ओढा पालकमंत्री यांच्या बाजूने असला तरी त्यांच्यावर नाराजी दाखवण्याचा प्रयत्न एका गटाकडून केला जात आहे. शिवसेनेच्या अंतर्गत गोटात याची खाजगी चर्चा सध्या शासकीय विश्रामगृहात जोरात चालते. त्याचा फटका या महापौरपदाला बसण्याची देखील शक्यता वर्तवली जाते. महायुतीमधील राष्ट्रवादीची परिस्थिती सध्या संथ असली तरी गेल्या दोन वेळा राष्ट्रवादीची सत्ता महापालिकेवर राहिली आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा नेतृत्व बांधण्याची आणि इच्छुकांना गोळा करण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादी पुढे आहे. महापालिकेतील नव्या नेतृत्वामुळे एकाने राष्ट्रवादीत जाण्यास नकार दिल्याचेही देखील कळते. शिवाय मंत्री मुश्रीफ यांचा कागल पुरता कारभार हा देखील कारणीभूत आहे. एकंदरीतच महायुतीकडून तिन्ही पक्षांचा महापौर पदासाठी दावा केला जात असला अंतर्गत मतभेद मिटवण्याचे आव्हान वरिष्ठ नेत्यांपुढे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com