Kolhapur Politics : कोल्हापुरात काँग्रेसने ठाकरेंच्या शिवसेनेला गुंडाळलं, महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यावरून गणित फिस्कटणार?

Kolhapur Municipal Election MVA Seat Sharing : कोल्हापूर महानगरपालिकेसाठी महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांची मदार ही काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या खांद्यावर आहे.
Kolhapur Municipal Corporation
Kolhapur Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 21 Dec : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुती आणि महाविकास आघाडीतील पदाधिकार्‍यांच्या जागा वाटपावरून मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. जागा वाटपा संदर्भातील समिती बैठका घेत जागांचा तिढा सोडवताना दिसत आहे. अशातच महायुतीला टक्कर देण्यासाठी कोल्हापुरात महाविकास आघाडीने चांगलीच मोट बांधली आहे.

पण हीच मोट आता जागा वाटपाच्या मुद्द्यांवरून फिस्कटण्याची शक्यता आहे. कोल्हापुरात काँग्रेसकडून या जागावाटपामध्ये ठाकरेंच्या सेनेला आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला गुंडाळण्याची शक्यता आहे. या जागा वाटपामध्ये काँग्रेसकडून ठाकरेंची सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षापुढे धक्कादायक प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेसाठी महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांची मदार ही काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या खांद्यावर आहे. महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडे अनेक मातब्बर उमेदवार आहेत.

मात्र याच जोरावर ठाकरेंची सेना आणि राष्ट्रवादीकडून काही उमेदवार देण्याची तयारी केली जात आहे. मात्र जागा वाटपाच्या चर्चेमध्ये केवळ जिंकून येणाऱ्या जागांवरच उमेदवारी निश्चित करण्याचे सूत्र या महाविकास आघाडीच्या समितीच्या बैठकीत घेण्यात आली. मात्र या बैठकीतील जागा वाटपाचा फॉर्म्युला पाहता ठाकरे सेनेला आणि राष्ट्रवादीला केवळ एक अंकीच जागा मिळण्याची शक्यता आहे.

Kolhapur Municipal Corporation
NagarPalika Nivdnuk Nikal Live भाजप आमदार अभिमन्यू पवार यांना धक्का, अजितदादांनी बाजी मारली

सरकारनामाच्या खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर महानगरपालिकेसाठी 81 जागांपैकी काँग्रेसला 75, ठाकरेंच्या सेनेला पाच तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला एक जागा देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंच्या सेनेने 33 तर राष्ट्रवादीने 20 जागांची मागणी केली होती. त्याचबरोबर ठाकरेंच्या सेनेने शिवाजी पेठेत आणि राजारामपुरीतील काही जागांवर दावा केला होता.

त्यावरून ही चर्चा फिस्कटली होती. पण काल झालेल्या चर्चेनुसार केवळ जिंकून येणाऱ्या जागेवरच चर्चा झाल्याने महाविकास आघाडी मधील हा फॉर्मुला ठरल्याचे सांगितले जाते. मात्र दोन्ही घटक पक्षाकडून नेमकी काय भूमिका घेतली जाणार हे देखील पहावे लागणार आहे. दरम्यान महाविकास आघाडी कडून आप देखील लढण्याची शक्यता आहे त्यामुळे काँग्रेस मधून आपला जागा सोडण्याची तयारी केली जाऊ शकते.

Kolhapur Municipal Corporation
Nagar Panchayat Result : निकालाआधीच अनगर नगरपंचायती संदर्भात मोठी अपडेट! निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या 'त्या' पत्रामुळे राजन पाटलांना मोठा दिलासा

ठाकरेंची शिवसेना व काँग्रेसमधील चर्चा सकारात्मक

कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेस यांच्यात महाविकास आघाडी अंतर्गत सुरू असलेल्या जागा वाटपाच्या चर्चांना सकारात्मक दिशा मिळाली आहे. सदर चर्चा सध्या अंतिम टप्प्यात असून येत्या एक-दोन दिवसांत जागा वाटपाचा प्रश्न पूर्णतः निकाली निघेल, अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख सुनील मोदी यांनी दिली.

महाविकास आघाडी म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक आम्ही एकजुटीने व ताकदीने लढणार असून जनतेच्या विश्वासावर सत्ता स्थापन करू, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कोल्हापूर शहराचा सर्वांगीण विकास, पारदर्शक कारभार आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांचे निराकरण हेच महाविकास आघाडीचे प्रमुख उद्दिष्ट राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com