Kolhapur News : विरोधी पक्षनेते पदासाठी अर्ज करायला आलेल्या कार्यकर्त्याला हृदयविकाराचा झटका.. परिसरात हळहळ

Congress Worker Death : कोल्हापूर महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते पदाच्या अर्जावेळी काँग्रेस कार्यकर्ता अनिल रावळ यांना हृदयविकाराचा झटका येऊन निधन झाले. घटनेनंतर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
Congress leaders and workers gather at Kolhapur Municipal Corporation after a party worker suffered a fatal heart attack during the Opposition Leader nomination process.
Congress leaders and workers gather at Kolhapur Municipal Corporation after a party worker suffered a fatal heart attack during the Opposition Leader nomination process.Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर महानगरपालिकेत आज काँग्रेसकडून नगरसेवक राजेश लाटकर यांचा विरोधी पक्ष नेते पदासाठी अर्ज भरण्यासाठी सोबत आलेल्या कार्यकर्त्याला हृदयविकाराचा झटका आला. उपस्थित नगरसेवकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांचे निधन झाल्याचे घोषित केले.

संपूर्ण प्रकरणानंतर महापालिकेसह सदर बाजार परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत झालेल्या कार्यकर्त्यांचे नाव अनिल रावळ असून ते सदर बाजार परिसरात राहतात. तसेच ते महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एसटी चालक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.

कोल्हापूर महानगरपालिकेत आज काँग्रेसकडून सकाळी साडेअकराच्या सुमारास राजेश लाटकर यांचा विरोधी पक्ष नेते पदासाठी अर्ज भरण्यासाठी सर्वच नगरसेवक आणि कार्यकर्ते दाखल झाले होते. त्यांच्यासोबत अनिल रावळ हे देखील महापालिकेत आले होते. रावळ यांच्या अचानक छातीत दुखू लागल्याने ते चक्कर येऊन कोल्हापूर महानगरपालिका इमारती गॅलरीतच खाली कोसळले. महानगरपालिका मुख्य इमारतीमधील ताराराणी सभागृहाबाहेर घटना घडली.

Congress leaders and workers gather at Kolhapur Municipal Corporation after a party worker suffered a fatal heart attack during the Opposition Leader nomination process.
Prakash Abitkar : कोल्हापूर-इचलकरंजीमध्ये महायुतीची 'स्ट्रॅटेजी' देणार विरोधकांना हादरा?; अबिटकरांनी सांगितला उपमुख्यमंत्र्यांचा 'तो' नवा 'फॉर्म्युला'

महापौरांकडून राजेश लाटकर यांना महापालिकेतील विरोधी पक्ष नेतेपदाचं पत्र देण्याचा कार्यक्रम सुरू असतानाच घटना घडल्याने अनेक नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची धावपळ उडाली. अनिल रावळ यांना वाचवण्यासाठी महापालिकेतील कर्मचाऱ्यांसह काँग्रेस नगरसेवकांनी शर्तीचे प्रयत्न केले. उपस्थित कर्मचाऱ्यांनी रावळ यांना सीपीआर करण्याचा प्रयत्न केला. मात्र रावळ हे प्रतिसाद देत नसल्याने सुरक्षा रक्षकांच्या मदतीने रावळ यांना खाजगी वाहतुकातून रुग्णालयात पाठवण्यात आले.

Congress leaders and workers gather at Kolhapur Municipal Corporation after a party worker suffered a fatal heart attack during the Opposition Leader nomination process.
Kolhapur ZP : यड्रावकरांनी बॉम्ब फोडला! 'जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आमचा असावा'; निर्णायक मतामुळे क्रेडिट वाढले!

मात्र उपचारापूर्वीच रावळ यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. रावळ हे राजेश लाटकर यांचे समर्थक असून ते एसटीच्या चालक पदावरून सेवानिवृत्त आहेत. मनमिळावू स्वभाव असल्याने ते सेवानिवृत्तीनंतर नेहमीच लाटकर यांच्या कार्यात सहभाग घेत होते. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना छातीमध्ये दुखण्याचा त्रास होत होता. त्यातूनही त्यांना ठीक वाटत असल्याने आज महापालिकेत येण्याचा निर्णय घेतला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com