'कोल्हापूर उत्तर' : भाजपकडून महेश जाधवांची प्रचारप्रमुख म्हणून बोळवणं

Mahesh Jadhav | Satyajit Kadam | BJP | Kolhapur : महेश जाधवांच्या नावाची शिफारस होवूनही कदमांना उमेदवारी
Mahesh Jadhav
Mahesh Jadhav Sarkarnama

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर (Kolhapur North) मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून (bjp) सत्यजित ऊर्फ नाना कदम (Satyajeet Kadam) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीने कदम यांच्या नावाची घोषणा केली. या निवडणुकीसाठी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव (Mahesh Jadhav) यांच्याही नावाची शिफारस राज्य भाजपकडून करण्यात आली होती. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासह अनेक स्थानिक नेते कदम यांच्यासाठी आग्रही होते. त्यानुसार निवडणूक समितीनेही कदम यांच्या पारड्यात वजन टाकले आहे.

या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या महेश जाधव यांच्या नावाची चर्चा होती त्यांच्याकडे निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. कदम यांच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी आता जाधव यांच्या खांद्यावर असणार आहे. सोबतच भाजपाचे कोल्हापूर महानगर जिल्हा अध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक लढविण्यात येणार आहे. तर निवडणूक प्रभारी म्हणून माजी खासदार धनंजय महाडिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Mahesh Jadhav
बंटी पाटील अर्धी लढाई जिंकले; कोल्हापूर उत्तरचा काँग्रेसलाच मान

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास १७ मार्चपासून सुरुवात झाली असून अंतिम मुदत २४ मार्च आहे. तर मतदान १२ एप्रिल रोजी होणार असून १६ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. (Satyajeet Kadam News)

Mahesh Jadhav
भाजपचा उमेदवार ठरला; कोल्हापूर उत्तरमधून सत्यजित कदम निवडणूक लढवणार!

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात बुधवारी (१६ मार्च) मुंबईत विरोधी पक्षनेते फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, भाजपचे प्रवक्ते धनंजय महाडिक आदी उपस्थित होते. या बैठकीत पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार कोण उमेदवार द्यायचा, यावर चर्चा झाली. निवडून येण्याची क्षमता, संपर्क आणि इच्छुकांची तयारी याचाही आढावा घेण्यात आला.

सत्यजित कदम हे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे भाचे आहेत. ते यापूर्वी कोल्हापूर महापालिकेवर नगरसेवक होते. त्यांनी २०१४ ला देखील याच मतदार संघात काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी २ नंबरची मत घेतली होती. तर महेश जाधव यांनीही २०१४ ला याच मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मत घेतली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com