Prashant Koratkar arrest : तीन दिवसांत पोलिसांची दोन तासांची झोप अन् कोरटकरला बेड्या, कसा सापडला?

Police investigation News : कोरटकरने 30 दिवस पोलिसांना गुंगारा दिला होता. अखेर तो कसा सापडला? पोलिसांनी नेमके काय केले? तपासात कोणत्या गोष्टी अडचणीच्या ठरल्या? त्याबाबत महेंद्र पंडित यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला आहे.
Prashant Kortkar
Prashant Kortkarsarkarnama
Published on
Updated on

kolhapur News : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य आणि कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देऊन 25 फेब्रुवारीपासून कोल्हापूर पोलिसांना गुंगारा देणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर कोल्हापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. कोल्हापूर पोलीस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि राजवाडा पोलीस ठाण्याच्या पथकाकडून सुरुवातीपासूनच झालेल्या नियोजनबद्ध करेक्ट कार्यक्रमामुळे कोरटकरला ताब्यात घेण्यात यश आले.

गेल्या महिनाभरात पोलिसांनी केलेला कसून तपास, तांत्रिक दृष्ट्या केलेले नियोजन आणि पोलिसांमधले असलेले समन्वय याचा फायदा कोल्हापूर पोलिसांना झाला. जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर कोरटकरने 30 दिवस पोलिसांना गुंगारा दिला होता. अखेर तो कसा सापडला? पोलिसांनी नेमके काय केले? तपासात कोणत्या गोष्टी अडचणीच्या ठरल्या? त्याबाबत महेंद्र पंडित यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला आहे. पण तपासानंतरच काही गोष्टी आणखी उजेडात येण्याची शक्यता आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जिवे मारण्याची धमकी दिल्यानंतर कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात नागपूरमधील प्रशांत कोरटकर त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हा नोंद होताच जुना राजवाडा पोलीस (Police) ठाण्याचे एक पथक कोरटकरला अटक करण्यासाठी नागपूरला रवाना झाले होते. मात्र गुन्हा दाखल होताच कोरटकर हा इंदोरला फरार झाल्याची माहिती समोर आली. पण फोनमधील आवाज आपला नसल्याचा दावा कोरटकर याने करत आपल्या आवाजाचा मोर्फ करण्यात आला असल्याचे स्पष्टीकरण दिले.

मात्र फॉरेन्सिक आणि टेक्निकल तपासानंतर कोरटकर याच्याच मोबाईलवरून इंद्रजीत सावंत यांना फोन झाल्याची माहिती तपासात पुढे आली. कोल्हापूर पोलीस नागपूरला पोहोचताच कोरटकर गायब झाला होता. तत्पूर्वी कोल्हापूर जिल्हा न्यायालयाकडून त्याने 11 मार्चपर्यंत अंतरिम जामीन घेत अटकपासून सुटका करून घेतली.

Prashant Kortkar
Shinde Vs Thackeray: मोठी बातमी ! एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे पहिल्यांदाच समोरा-समोर; नार्वेकरांच्या दालनात नेमके काय घडले...

11 मार्चला पर्यंत कोरटकरला दिलासा मिळाला. कोल्हापूर न्यायालयाकडून पोलिसांची बाजू ऐकून न घेता जामीन दिल्याने कोल्हापूर पोलिसांनी मुंबईत उच्च न्यायालयात (High Court) हा अंतरिम जामीन रद्द करण्याची मागणी केली. त्यावर सुनावणी देत कोल्हापूर न्यायालयावर देखील ताशेरे ओढले. त्यानंतर झालेल्या सुनावणीत कोरटकरला मिळालेला अंतरिम जामीन मुदतवाढीचा अर्ज नामंजूर करण्यात आला.

त्यानंतर त्याच्यावर अटकेची टांगती तलवार राहिली. तत्पूर्वी 11 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मिळाल्याने कोल्हापूरचे पथक माघारी फिरले होते. पण मागील आठवड्यात झालेल्या सुनावणीत अंतरीम जामीन रद्द केल्याने पुन्हा कोरटकरच्या अटकेसाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे असे एकूण बारा ते पंधरा जणांचे पथक नागपूरला रवाना झाले.

Prashant Kortkar
Eknath Shinde Controversy : 'ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी...', एकनाथ शिंदेंवर वादग्रस्त गाणं, शिवसैनिक आक्रमक; स्टुडिओ फोडलं, कुणाल कामरावर गुन्हा

कोरटकरला 11 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मिळाल्यानंतर फॉरेन्सिक लॅब मधील तपासणीसाठी आणि आवाजाचे सॅम्पल घेण्यासाठी कोरटकर यांना अटक होणे गरजेचे होते. मात्र अंतरिम जामीन मिळाल्याने कोरटकरला अटक करता येत नव्हती. मात्र तोपर्यंत कोरटकर ज्या वाहनातून तो फिरत होता. त्या वाहनाच्या मार्गावर कोल्हापूर पोलिसांचे एक पथक त्याच्या वाहनावर लक्ष्य ठेवून होते.

अखेर अंतरिम जामीनाची मुदत संपल्यानंतर पुन्हा मुदतवाढ मिळण्याचा अर्ज फेटाळल्यानंतर कोरटकर यांनी पहिल्या वाहनाचा ताबा सोडून दुसऱ्या वाहनातून प्रवास सुरू केला. त्यावेळी तो चंद्रपुरात असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली. मोटारीचा तपास करत तांत्रिकदृष्ट्या मदत घेत कोल्हापूर पोलिसांचे पथक कोरटकर असलेल्या ठिकाणी म्हणजेच चंद्रपुरात पोहोचले होते. पण कोरटकरणे पोलिसांना गुंगारा देण्यासाठी पण दुबईत गेला असल्याचा फोटो शेअर केला.

Prashant Kortkar
Bhaskar Khatgaonkar : अजितदादांच्या राष्ट्रवादीत दाखल होताच खतगावकरांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, 'लोकसभेला चव्हाणांच्या विरोधात...'

कोरटकर हा दुबईला गेल्याची चर्चा झाल्यानंतर त्याचा पासपोर्ट पोलिसात जमा करण्याची मागणी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केली. त्यामुळे कोरटकर यांच्या पत्नीने त्याचा पासपोर्ट नागपूर पोलिसांच्या मदतीने कोल्हापूर पोलिसांकडे सुपूर्त केला. त्यामुळे कोरटकरच्या सर्वच वाटा बंद झाल्या. पण चंद्रपुरात तळ ठोकून असलेला कोरटकरने पुन्हा आपले स्थान बदलले. तर वाहन ही बदलले. अज्ञातस्थळी निघून गेला. कोरटकरकडे असलेला मोबाईल त्याचेही लोकेशन मिळत नसल्याने पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले होते.

Prashant Kortkar
Shivraj Patil : काँग्रेसने भरभरून दिलेल्या चाकूरकरांची वाजपेयींनंतर आता मोदींशीही जवळीक; राजकारणापलीकडील 'मैत्री' की..?

कोल्हापूर पोलिसांच्या पथकांकडून चंद्रपुरातून बाहेर पडणाऱ्या महामार्गावरील टोल नाक्यांच्या सीसीटीव्हीची पाहणी केली. पाहणी करत असताना एका आलिशान गाडीतून कोरटकर तेलंगणाच्या मार्गे गेला असल्याचं पोलीस तपासात उघड झाले. पोलिसांना याची माहिती मिळताच तपासाची चक्रे आणखी गतिमान केली. कोल्हापूर पोलिसांना याची माहिती शनिवारी मिळाली. कोणतीही रिस्क न घेता पोलिसांनी खबरदारी बाळगत कोरटकर कुठे असू शकतो? याचा अचूक शोध घेतला. कोरटकरला पळून जाण्यास वेळ न देता कोल्हापूर पोलीस आली तीन दिवसाच्या दौऱ्यात केवळ दोन तासाची झेप घेत तेलंगणा राज्यातील मंचरियाल या रेल्वेस्थानकाशेजारी त्याचे लोकेशन आढळून आले.

सोमवारी दुपारी तिथूनच त्याला ताब्यात घेतले. स्थानिक पोलिसांकडे त्याची माहिती देत कोल्हापूर पोलिसांनी कोरटकर यांना ताब्यात घेतल्याची माहिती त्यांच्या पत्नींना दिली. दुपारी साडेतीनच्या दरम्यान कोरटकरला घेऊन कोल्हापूरचे पोलीस कोल्हापूरकडे रवाना झाले. उद्या पहाटेपर्यंत कोरटकरला कोल्हापुरात आणले जाईल. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून दुपारी बाराच्या दरम्यान त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Prashant Kortkar
Raj Thackeray News : राज ठाकरे गुढीपाडवा मेळाव्यात करणार मोठी घोषणा; सोशल मीडियावर टिझरची चर्चा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com