
किल्ले विशाळगडावरील हिंसाचाराला 13 महिने उलटून गेल्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली.
शाहुवाडी पोलिसांनी मुख्य सूत्रधार रवी पडवळ याला हडपसर येथे अटक केली.
13-14 जुलै 2023 दरम्यान झालेल्या हिंसाचार प्रकरणात ही मोठी कारवाई समजली जात आहे.
Kolhapur News : किल्ले विशाळगडावरील हिंसाचाराला 13 महिने उलटल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शाहुवाडी पोलिस पथकाने हिंसाचारातील मुख्य सूत्रधार समजला जाणारा रवी पडवळ याला मंगळवारी (ता.26) मध्यरात्री अटक केली आहे. कोल्हापूर पोलिसांना हडपसर येथील एका घरात तो असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पहाटे अडीचच्या सुमारास संशयित रवी पडवळ याला अटक करण्यात आली. 13 जुलै ते 14 जुलै या दरम्यान किल्ले विशाळगड येथे हिंसाचार घडला होता.
14 जुलै रोजी किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात झालेल्या मोर्चा वेळी हिंसाचार घडला होता. यावेळी गड पायथ्याला असणाऱ्या मुसलमानवाडी येथील रहिवाशांच्या घरावर काही समाजकंटकांनी हल्ला केला होता. हल्ल्यात प्रापंचिक साहित्यासह घरांची मोडतोड, जाळपोळ, वाहनांचे नुकसान यासह धार्मिक स्थळावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न काही जणांनी केला होता. प्रकरणी शाहूवाडी पोलीस ठाण्यात रवी पडवळ यांच्यासह जवळपास 450 तरुणांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता.
दरम्यान यातील काही तरुणांना अटक करून न्यायालयीन कोठडी देखील देण्यात आली होती. त्यातील 14 जणांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. मात्र संशयित मुख्य सूत्रधार समजला जाणारा रवी पडवळ हा पोलिसांना गुंगारा देत पसार झाला होता. अखेर आज मध्यरात्री पुणे जिल्ह्यातील हडपसर येथे रवी पडवळ असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
विशाळगडचा हिंसाचार झाल्यानंतर महिनाभरातच रवी पडवळ हा सोशल मीडियातून रोज ऑनलाईन आणि लाईव्ह येत असे. अनेक मुद्द्यांवर तो विचार व्यक्त करत होता. तर त्याच्याच गो शाळेत तो काम करत असे. याची संपूर्ण माहिती तो आपल्या सोशल मीडियातून इतरांना देत होता. एरवी सुतावरून स्वर्ग गाठणाऱ्या कोल्हापूर पोलिसांना एखादा साधा गुन्हेगार तत्काळ सापडतो. मात्र रवी पडवळ हा 13 महिने पसार असताना देखील पोलिसांनी कारवाईसाठी टाळाटाळ केली. मात्र 13 महिन्यानंतर पोलिसांचे डोळे उघडले आहेत.
प्रश्न 1: रवी पडवळला कधी अटक करण्यात आली?
उत्तर: 26 ऑगस्ट मध्यरात्री शाहुवाडी पोलिसांनी त्याला अटक केली.
प्रश्न 2: रवी पडवळला कुठून अटक करण्यात आली?
उत्तर: पुण्यातील हडपसर येथील एका घरातून.
प्रश्न 3: विशाळगड हिंसाचार कधी घडला होता?
उत्तर: 13 ते 14 जुलै 2023 दरम्यान.
प्रश्न 4: या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण समजला जातो?
उत्तर: रवी पडवळ.
प्रश्न 5: पोलिस कारवाईत कोण सहभागी होते?
उत्तर: शाहुवाडी पोलिस पथकाने ही कारवाई केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.