BJP Protest : काँग्रेस कार्यालयाबाहेर हायहोल्टेज ड्रामा! धडक मोर्चा काढत आंदोलन करणाऱ्या भाजप आमदार, महापौरांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी उचललं

kolhapur police detain bjp mla, mayor and party workers : नीट पेपरफुटी प्रकरणावरून राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून गल्ली ते दिल्ली असा हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे.
BJP MLA Leads March Towards Congress Office In Kolhapur
BJP MLA Leads March Towards Congress Office In Kolhapursarkarnama
Published on
Updated on

kolhapur News : नीट पेपरफुटी आणि जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला कोंडीत पकडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवास स्थानाबाहेर आंदोलन केले.

या आंदोलनानंतर आता देशभर भाजपकडून संताप व्यक्त केला जात आहे. काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर भाजपचे नेते आंदोलन करत आहेत. असेच आंदोलन कोल्हापुरात करण्यात येणार होते. काँग्रेस कमिटी कार्यालय १ किलोमीटर दूर असतानाचा पोलिसांनी भाजप आमदार, महापौरांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कॉकरोच जनता पार्टीने केली आहे. सीजेपीने या मागणीसाठी आंदोलन सुरू केले असतानाच दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यी आंदोलकांवर लाठीचार्ज केला.

BJP MLA Leads March Towards Congress Office In Kolhapur
BJP Protest : आंदोलनादरम्यान भाजप खासदार अचानक कोसळले; तातडीने रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघाडाचे कारणंही आलं समोर...

तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यावरून देशात संताप उसळला असून विरोधकांनी या घटनेवरून संसदेचे पावसाळी अधिवेशनात सरकारला धारेवर धरले आहे. तसेच जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत कोणतीच चर्चा होणार नाही अशी भूमिका घेतली आहे.

यावरून आता भाजप आणि काँग्रेसमध्ये संघर्ष वाढला असून गल्ली ते दिल्ली तणाव अधिकच वाढला आहे. या संघर्षाची धग आता कोल्हापुरात देखील पोहचली. भाजप आमदार अमल महाडिक, महापौर रुपरणी निकम यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कमिटी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

BJP MLA Leads March Towards Congress Office In Kolhapur
BJP Protest : आपल्याच सरकारविरोधात घोषणा; 'या सरकारचं करायचं काय....!'; नेत्यांची फजिती सोशल मीडियावर व्हायरल

मात्र मोर्चो काँग्रेस कमिटी कार्यालयापर्यंत पोहोचण्याआधीच आमदार, महापौरांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांनी पोलीस व्हॅनमध्ये भरलं आणि दुसऱ्या ठिकाणी नेलं. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून भाजपविरोधात जोरदार घोषणबाजी करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com