MLC Satej Patil : वारं फिरलं...! काँग्रेसच्या सतेज पाटलांसाठी विधान परिषदेची तिसरी टर्म 2014, 2021 इतकी सोपी नसणार...

Satej Patil Legislative Council Third Term : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. विशेषत: मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या चार विद्यमान आमदारांना संधी मिळाली होती. पण यंदा काँग्रेसच्या एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही.
Satej Patil
Satej PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 18 Dec : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. विशेषत: मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या चार विद्यमान आमदारांना संधी मिळाली होती. पण यंदा काँग्रेसच्या एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही.

महाविकास आघाडीच्या विजयाची धुरा खांद्यावर घेऊन निवडणुकीला सामोरे गेलेले काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) यांच्यासाठी विधानसभेतील पराभव हा मोठा धक्का आहे. विधानसभेच्या निकालाने जिल्ह्यातील राजकारणात नवी समीकरणे उदयाला आल्याने पुढील दोन ते तीन वर्षात होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी सतेज पाटलांना पुन्हा फेरमांडणी करावी लागणार आहे. याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

2014 मध्ये कोल्हापूर (Kolhapur) दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आमदार अमल महाडिक यांच्याकडून पराभव झाल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेच्या माध्यमातून विधिमंडळात एन्ट्री केली. त्या वेळी जिल्ह्यातील राजकीय समीकरण हे पाटील यांच्या मदतीला आले होते. तर 2021 च्या विधान परिषदेत भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी माघार घेतल्यानंतर सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

त्यावेळच्या राजकीय समि‍करणांचा फायदा सतेज पाटील यांना झाला. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महायुती (Mahayuti) म्हणून सर्वच पक्ष एकत्र आले आहेत. शिवाय विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांची विजयाची धुरा सतेज पाटील यांच्यावर टाकल्यानंतर प्रत्येक मतदारसंघातून केलेला प्रचार हा पाटील यांच्या अडचणीचा ठरणार आहे.

Satej Patil
Amit Shah : आंबेडकरांविषयी अमित शहांच्या कोणत्या विधानामुळे विरोधकांचा संताप? दिल्लीसह महाराष्ट्रतही पडसाद

कोल्हापूर जिल्ह्यात पक्षीय राजकारणापेक्षा गटातटाच्या राजकारणाला अधिक महत्त्व आहे. यापूर्वी पक्षाच्या पलीकडे जाऊन सतेज पाटील यांना राजकीय मदत होत आली आहे. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता गोकुळ दूध संघ, जिल्हा बँक, स्थानिक स्वराज्य संस्था याची समीकरणे नव्याने तयार झालेली आहेत.

जुन्या समिकरणाचा फायदा पाटलांना होणार की नाही याबाबत आता शंका उपस्थितीत झाली आहे. नव्या समि‍करणांना जुळवून घेण्याचं पाटील यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. सध्या महायुती म्हणून सर्वच नेते एकत्र आल्याचे दिसते. त्यामुळे राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसला स्वतःला सावरण्याची गरज आहे.

Satej Patil
Sharad Pawar Meet PM Modi : दिल्लीतील PM मोदींसोबतच्या भेटीत नेमकी चर्चा काय? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप विरोधात प्रभावित मुद्दे शोधण्याची गरज आहे. स्थानिक मुद्दे प्रश्न आणि समस्या प्रभावीपणे मांडण्याची गरज आहे. या मुद्द्यांच्या जोरावरच स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेस सोबत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना सर्वाधिक निवडून आणण्याची जबाबदारी पाटील यांच्यावर असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com