Kolhapur Politics : मुश्रीफ आता तुम्ही थांबा; मंडलिक गटाचे उपकार फेडा, वीरेंद्र मंडलिकांनी सर्वांची कुंडली काढली

Kagal Assembly Constituency : राज्याभरात चर्चेचा विषय ठरलेल्या कागल विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळत आहे. महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक यांचे सुपुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी उमेदवारीवर दावा केला आहे.
Hasan Mushrif, Sanjay Mandlik, Virendra Mandlik
Hasan Mushrif, Sanjay Mandlik, Virendra MandlikSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 08 Oct : राज्याभरात चर्चेचा विषय ठरलेल्या कागल विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळत आहे. महायुतीचे (Mahayuti) संभाव्य उमेदवार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर हल्लाबोल करत महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक यांचे सुपुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी उमेदवारीवर दावा केला आहे.

स्वर्गीय मंडलिक साहेबांनी जात पात न पाहता आपल्याला संधी दिली. त्या जोरावरच तुम्ही पाच वेळा तुम्ही आमदार झाला. मात्र, आता तुम्ही थांबा. मंडलिक गटाचे उपकार फेडा, असं म्हणत या विधानसभा निवडणुकीला मी इच्छुक असल्याचं वीरेंद्र मंडलिक यांनी जाहीर केलं आहे.

मंडलिक गटाकडून आज कागल (Kagal) विधानसभा मतदारसंघातील शेंडूर येथे मेळावा घेण्यात आला. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे यांच्यावर तोफ डागली. या मेळाव्याच्या अध्यक्षीय भाषणात बोलताना वीरेंद्र मंडलिक यांनी, हा मेळावा झलक आहे, पण कुणाला पिक्चर बघायचा आहे तो देखील दाखवू, असे सांगत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना खुले आव्हान दिले.

लोकसभेच्या निवडणुकीत महायुती ओबीसी द्वेष करत असल्याचा नरेटिव्ह तयार करण्यात आला. पण दलित, मुस्लिम समाजाला महायुतीने समान न्याय दिला. लोकसभेचे तिकीट मिळवण्यासाठी 20 ते 22 दिवस वाट बघायला लागली. जे तुतारीकडे गेले त्यांच्यामुळे ही वाट बघायला लागली. स्व‍कीयांच्या वागण्यामुळे लोकसभेला आम्हाला फटका बसल्याचंही आरोपही वीरेंद्र मंडलिक यांनी केला.

लोकसभेला आमच्या विरोधात असलेले संजयबाबा घाटगे यांनी आता मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना पाठींबा दिला. समरजित घाटगे यांनी कार्यकर्त्यांना जनक घराणं आणि आताचं घराणं एकच आहे. तुम्हाला काय करायचं ते करा. असा निरोप ग्राउंडपर्यंत दिला. मुश्रीफसाहेब यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांनी शाहू महाराजांना मदत करण्याचे सांगितले.

Hasan Mushrif, Sanjay Mandlik, Virendra Mandlik
Haryana Election Result 2024 : विरेंद्र सेहवागने ज्या उमेदवारासाठी हरियाणात 'बॅटिंग' केली, त्याचं काय झालं?

गोकुळ संघाच्या निवडणुकीत मी आणि माझी आत्या यांचा पराभव केला. सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी ठरवून मला पाडलं. उद्धव ठाकरे साहेबांनी मला गोकुळवर घ्या असं सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांना सांगितले होते. पण मी गोकुळमध्ये नको असे या दोन्ही नेत्यांनी थेट सांगितले असल्याचा आरोप वीरेंद्र मंडलिक यांनी केला.

समरजीत घाटगे आणि हसन मुश्रीफ यांनी प्रामाणिक काम केलं नाही. म्हणून कागलमध्ये आमचं लीड 14 हजार झालं. मुश्रीफसाहेब हे पाच वेळा आमदार आणि मंत्री झाले आता त्यांना अँटी इन्कमबन्सीचा फटका बसणार आहे. आता कागल मतदारसंघात लोक म्हणतात की, हसन मुश्रीफ नको बाकी कोण पण असू दे. आता हसन मुश्रीफ थांबणार आहे का नाही?

Hasan Mushrif, Sanjay Mandlik, Virendra Mandlik
Mahayuti: महायुतीत फूट? शिवसेना करणार फडणवीसांकडे तक्रार; पदाधिकाऱ्यांची नाराजी

मंडलिक गटाचे जे उपकार आहेत त्याची परतफेड कधी करणार? हसन मुश्रीफ यांनी मला त्रास दिला मी त्यांना त्रास द्यायला उभा राहणार हे नक्की, असे व्यासपीठावरून वीरेंद्र मंडलिक यांनी पालकमंत्री मुश्रीफ यांना आव्हान दिले आहे. हसन मुश्रीफ यांनी माझे खेकड्यासारखं पाय ओढण्याचं काम केलं. हसन मुश्रीफ तुम्ही 29 वर्षाच्या तरुणाला घाबरता. पण आता तुम्ही थांबा. मंडलिकांची उपकार फेडा असे देखील वीरेंद्र मंडलिक म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com