Kolhapur News : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा केला आहे. त्यासोबतच शिवसेना शिंदे गटाचाही दावा आहे. भाजपच्या चिन्हावर संजय मंडलिक यांनी निवडणूक लढवावी, यासह अनेक चर्चा गेल्या महिनाभराच्या काळात कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू होत्या. या सर्व घडामोडीनंतरही कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय मंडलिक यांनी कोणतीच भूमिका आतापर्यंत माध्यमांसमोर मांडली नव्हती. अखेर त्यांनी आज मौन सोडून उमेदवारीबाबत आपली भूमिका मांडली आहे.
शिवसेनेत (Shivsena) दोन गट पडल्यानंतर शिवसेनेच्या 13 खासदारांनी शिंदे गटाला पाठींबा दिला, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) महायुतीत आम्हाला एकूण 23 जागा मिळाव्यात, अशी मागणी केली आहे. आम्ही शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरच निवडणूक लढवणार आहोत. भाजपच्या (BJP) चिन्हावर आम्ही लोकसभा लढवणार, हे फक्त माध्यमातून पुढे आणलं जात आहे. आम्ही भेटत नाही, चिन्ह बदलायला सांगितलं गेले, या केवळ अफवा आहेत. असे सांगत खासदार संजय मंडलिक यांनी शिवसेनेचे विद्यमान खासदार आहे, त्या ठिकाणी लढतील. उलट 23 जागांची मागणी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आम्हाला निधी देण्यात आला नाही. उलट दोन्ही काँग्रेसला जास्त निधी देण्यात येत होता. त्यामुळे आमची उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नाराजी वाढत गेली. आम्ही शिंदे साहेबांना बॅकलॉग भरून काढणार का? असं विचारून सोबत गेलो आहे. त्यानुसार मोठ्या प्रमाणात निधी मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी दिला आहे. पाच वर्षात काय केलं, हे सांगायला मी मतदारसंघात दौरा करत असल्याचे मंडलिक यांनी सांगितले.
महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) इच्छुक उमेदवारांपैकी श्रीमंत शाहू महाराज यांचे नाव आघाडीवर आहे, त्याबाबत खासदार मंडलिक यांनी, शाहू महाराज यांना नेहमी वडिलांच्या समान मानतो. आम्ही नेहमी आदर केला आहे. मात्र, निवडणुकीत समोर कोण आहे, हे मी पाहिलं नाही. अमित शाह यांना आता नाही, तर पक्षप्रवेश केला, त्यावेळी भेटलो होतो. शिंदेसाहेब आमच्या पक्षाचे सक्षम नेते आहेत, त्यामुळे सध्या अमित शाह यांना भेटलो नसल्याचा निर्वाळा खासदार मंडलिक यांनी केला.
कोल्हापूरची 2009 लोकसभा निवडणूक ही शरद पवार विरुद्ध कोल्हापूरची (Kolhapur) जनता अशी झाली होती. त्यावेळी तरुणांना संधी म्हणून शरद पवार यांनी (स्व.) सदाशिवराव मंडलिक यांना डावलले होते. आताच्या निवडणुकीतही कोल्हापूरकर आमच्या बाजूने उभे राहतील, असा विश्वास मंडलिक यांनी व्यक्त केला.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.