Kolhapur ZP Election : राजू शेट्टींची साथ सोडण्याची रिस्क, विधानसभा अन् नगरपरिषदेत मदत; त्यानंतरही यड्रावकरांकडून सावकार मादनाईकांचा गेम?

Kolhapur ZP Election : महायुतीमधील मित्रपक्षांनीच आपले राजकीय अस्तित्व संपवण्याचा कट आखल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते सावकर मादनाईक यांनी केला आहे. आमदार यड्रावकरांचे नाव न घेता केलेल्या या विधानामुळे शिरोळमध्ये राजकीय खळबळ उडाली आहे.
Senior BJP leader Anil alias Savkar Madnaik addressing a press conference in Jaisingpur, where he made serious allegations regarding a political conspiracy within the Mahayuti alliance.
Senior BJP leader Anil alias Savkar Madnaik addressing a press conference in Jaisingpur, where he made serious allegations regarding a political conspiracy within the Mahayuti alliance.Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur ZP : लोकसभा निवडणूक झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत आणि जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची साथ सोडून आलेल्या सावकार मादनाईक यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना मदत केली. मात्र आता माजी आमदार यड्रावकर सावकार मादनाईक यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करत आहेत की काय? त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसत आहेत की काय? असा सवाल जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने सावकार मादनाईक यांनी केलेल्या वक्तव्यावरून निर्माण होत आहे.

महायुती म्हणून विधानसभा व जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीत ज्यांना मनापासून पाठिंबा दिला, त्याच लोकांनी माझे राजकीय अस्तित्व संपवण्याचा कट आखला आहे, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल उर्फ सावकर मादनाईक यांनी आमदार यड्रावकर यांचे नाव न घेता केला. जयसिंगपूर नगरपालिका तुमच्यासाठी महत्त्वाची असेल, तर उदगाव माझं गाव असून मला माझा मतदारसंघ का नको? असा थेट सवाल मादनाईक यांनी उपस्थित केला.

उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून आपण आजपर्यंत सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम केले आहे. या मतदारसंघातून अनेक कार्यकर्त्यांना मोठ्या पदावर नेण्याचा इतिहास माझा आहे. जिल्हा परिषद सदस्यापासून अध्यक्ष, आमदार आणि खासदार होईपर्यंत ज्यांनी वाटचाल केली, त्या प्रत्येकाच्या पाठीशी मी प्रामाणिकपणे उभा राहिलो आहे, मात्र त्याच मतदारसंघात आपल्यालाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे, असे मादनाईक म्हणाले.

Senior BJP leader Anil alias Savkar Madnaik addressing a press conference in Jaisingpur, where he made serious allegations regarding a political conspiracy within the Mahayuti alliance.
Kolhapur Mayor : भाजपने निष्ठावंतांना डावललं! कोल्हापूरच्या महापौरपदावर महाडिकांचा वरचष्मा; एका निवडीने साधले दक्षिणचे राजकारण

जाणीवपूर्वक राजकीय खेळी करून आपले अस्तित्व कमी करण्याचा आणि राजकारणातून बाद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा सगळा प्रकार आता मतदारांच्या लक्षात आलेला आहे. त्यामुळे जनता जागी झाली आहे, असा ठाम विश्वासही मादनाईक यांनी व्यक्त केला. उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघ माझ्यासाठी केवळ राजकारण नाही, तर आत्मीयतेचा विषय आहे. मला इथे संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना याच मतदारसंघातील जनता योग्य वेळी उत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com