

Kolhapur politics : विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर आरोप केले. तसेच नुकतेच काँग्रेस मधून शिवसेनेत गेलेले शारंगधर देशमुख यांच्यावर देखील निशाणा साधला. त्याचे प्रत्युत्तर शारंगधर देशमुख यांनी शिवसेनेच्या मेळाव्यातून राजेश लाटकर यांना दिले आहे.
विधानसभेत पराभूत झालेल्या आणि एक वर्षाने उगवलेल्या उमेदवाराने परवाच पत्रकार परिषद घेतली. यामध्ये किमान 20 वेळा त्यांनी माझं कोल्हापूर असा उल्लेख केला.. पण ते उमेदवार प्रचार सोडून कधी कावळा नाक्याच्या पुढे आलेच नाहीत, असा उपहासात्मक टोला शारंगधर देशमुख यांनी राजेश लाटकर यांचे नांव न घेता लगावला.
माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून शहराचा विकास करण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यात सगळ्यात जास्त काम शिवसेनेने केले आहे. त्याचमुळे शिवसेनेला निवडणुकात एक नंबरची पसंती मिळत आहे. या चांगल्या वातावरणाचा फायदा करून घ्या. पुढील काळात शिवसेनेची पद्धतच महानगरपालिकेत राबेल. एकसंघपणे काम करून शिवसेनेचे (Shivsena) जास्तीत जास्त नगरसेवक निवडणून आणूया.
आतापर्यंत आम्ही केलेल्या पाहणीत 13 मतदारसंघातच 40 पेक्षा अधिक इच्छुक उमेदवार शिवसेनेकडे आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केल्या- केल्या निधीची पूर्तता होते. कोट्यावधी रुपयांचा निधी या शहराला मिळाला आहे. त्यातून विकास कामे सुरु असल्याचे नमूद केले.
तसेच महानगरप्रमुख शिवाजी जाधव यांनी, थेट पाईपलाइनच्या पाण्याने अंघोळ करताना बादली नेमकी कोणी दिली..??? त्यांनीच आणली का तुम्ही दिली, अशी कोपरखळी मारली. त्यावर देशमुख यांनी, थेट पाईपलाईन मध्ये किती पाणी मुरलंय आणि पाण्याला कुठले कलर दिले गेलेत हेही वेळ आल्यावर जाहीर करू, असे उत्तर देताच त्याला शिवसैनिकांनी टाळ्यांनी दाद दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.