Bribery Case : ACB ची धडक कारवाई, सरपंच आईसह मुलावर गुन्हा दाखल; ना हरकत दाखल्यासाठी लाच मागणे पडले महागात

Kolhapur bribery case latest news : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील जैनापूर येथे सरपंच तथा प्रशासकाचा कारनामा उघड झाला आहे. लाच मागणाऱ्या प्रशासकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Crime of Bribery
Crime of BriberySarkarnama
Published on
Updated on
Summary
  • कोल्हापूर जिल्ह्यातील जैनापूर येथील सरपंच संगीता कांबळे आणि त्यांचा मुलगा ACB च्या जाळ्यात अडकले.

  • ना हरकत दाखला देण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप असून जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

  • या घटनेमुळे स्थानिक प्रशासनातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Kolhapur news : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील जैनापूर येथील सरपंच तथा प्रशासक संगीता रमेश कांबळे (वय ५२) आणि त्यांचा मुलगा निकेत रमेश कांबळे (वय ३०, रा. जैनापूर) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. या दोघांविरोधात ना हरकत दाखला देण्यासाठी लाच मागितल्या प्रकरणी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईनंतर मुलगा निकेत कांबळे याला जयसिंगपूर येथील न्यायालयासमोर उभे केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. रक्तदाब वाढल्याने सरपंच कांबळे यांना सांगली सिव्‍हिल रुग्णालयात दाखल केले आहे.

या विभागाने दिलेली माहिती अशी : तक्रारदारास पत्नीच्या नावे शेडनेट व्यवसायासाठी ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला हवा होता. त्यासाठी ग्रामपंचायतीत अर्ज केला. यावेळी सरपंच कांबळे यांनी दहा हजारांची मागणी केली.

Crime of Bribery
Bribery Case : 15 लाखांची लाच मागणाऱ्या अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल; हॉटेल व्यावसायिकावर टाकत होता दबाव

तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. पथकाने याची पडताळणी केली असता दोघांनी नऊ हजार घेण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. या दोघांनी काम पूर्ण झाल्यावर पैसे द्या, असे म्हणत पैसे घेण्यास नकार दिला.

मात्र, पडताळणीमध्ये लाचेची मागणी स्पष्ट झाल्याने गुन्हा दाखल झाला. कारवाई पथकात विभागाच्या कोल्हापूर उपअधीक्षक वैष्णवी पाटील,  निरीक्षक उज्वला भडकमकर, सुनील मोरे, सुधीर पाटील, संगीता गावडे, संदीप पवार यांचा समावेश होता.

पद रद्द; पण...

सरपंच कांबळेंविरोधात १३ मे २०२५ रोजी अविश्वास ठराव मंजूर झाला होता. त्यानंतरच्या सरपंच निवडीत विरोधी सदस्यांकडे अनुसूचित जाती महिला सदस्य नसल्याने पुन्हा त्या सरपंच झाल्या होत्या.

Crime of Bribery
Bribe Case : महापालिका प्रशासनात खळबळ!उपायुक्तांना लाच घेताना अटक, 21 लाखांच्या...

FAQs :

1. ही घटना कुठे घडली?
ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील जैनापूर येथे घडली.

2. कोणावर कारवाई करण्यात आली आहे?
सरपंच संगीता कांबळे आणि त्यांचा मुलगा निकेत कांबळे यांच्यावर कारवाई झाली आहे.

3. त्यांच्यावर नेमका काय आरोप आहे?
ना हरकत दाखला देण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप आहे.

4. कारवाई कोणत्या विभागाने केली?
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ACB ने कारवाई केली.

5. प्रकरण सध्या कुठे नोंदवले आहे?
जयसिंगपूर पोलिस ठाण्यात या प्रकरणाची नोंद झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com