Bribe Case : महापालिका प्रशासनात खळबळ!उपायुक्तांना लाच घेताना अटक, 21 लाखांच्या...

Navi Mumbai Kailas Gaikwad Arrested : नवी मुंबई महापालिका उपायुक्तांना लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले. या कारवाईने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली.
bribe Case
bribe Casesarkarnama
Published on
Updated on

Navi Mumbai News : कंत्राटदाराकडून लाच घेताना नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांना लाच घेताना रंगेहात पकडले. महापालिकेतील त्यांच्या दालनातच ही कारवाई करण्यात आली. या गायकवाड यांच्या अटकेने प्रशासनात खळबळ उडाली आहे. 42 हजारांची लाच घेताना गायकवाड यांना अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, कंत्राटदार दशरथ सुरवसे यांना महापालिकेतील अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी वाहने व कामगार पुरवण्याचे काम करतात. त्यांनी ऐरोली विभागात ही सेवा पुरवली होती. नोव्हेंबर 2024 ते 15 फेब्रुवारी 2025 या कालावधीत सुरवसेंनी सेवा पुरवली होती. त्यामुळे महापालिकेकडून त्यांचे 21 लाख रुपयांचे बिल येणे बाकी होते.

हे 21 लाखांचे बिल मंजूर करून देण्यासाठी उपायुक्त गायकवाड यांनी तब्बल 42 हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबात सुरवसे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.विभागने देखील याची पडताळणी करत गायकवाड यांच्या विरोधात सापळा रचला होता.

bribe Case
Corruption Case : फडणवीसांकडील खात्यात 'ACB' ची धडक कारवाई, बडा अधिकारी अटक; मंत्री झिरवाळ प्रकरणानंतर पुन्हा खळबळ

कार्यालयातच रंगेहाथ पकडले

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आल्यानंतर त्यांनी तक्रारीची खातरजमा केली. महापालिकेच्या मुख्यालयात तिसऱ्या मजल्यावर गायकवाड यांचे कार्यालय आहे. तिथे गायकवाड हे तक्रारदाराकडून लाच घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धापा टाकत गायकवाड यांना रंगहात पकडले.

bribe Case
Pune ACB trap : महसूल विभागात खळबळ! 'बडा मासा' एसीबीच्या ट्रॅपमध्ये अडकला; प्रांताधिकाऱ्यांवरच होणार कठोर कारवाई

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com