Bribery Case : 15 लाखांची लाच मागणाऱ्या अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल; हॉटेल व्यावसायिकावर टाकत होता दबाव

Corruption case registered against FDA officer : कोल्हापूर येथे अन्न व औषध प्रशासन विभागात अधिकारी असणाऱ्या लवटे याने सोलापुरच्या हॉटेल व्यावसायिकावर मध्यस्थीसाठी दबाव टाकत १५ लाखांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
food drug
food drugsarkarnama
Published on
Updated on
Summary
  • FDA अधिकारी मंगेश लवटे यांच्यावर 15 लाख लाच मागितल्याचा आरोप

  • लोकायुक्तांकडे तक्रारीनंतर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

  • प्रकरणाचा तपास सुरू असून अधिकाऱ्यावर गंभीर आरोप

Kolhapur News : कर्नाटकातील गुटखा व्यापाऱ्याकडून १५ लाख रुपये घेण्यासाठी मध्यस्थावर वारंवार दबाव टाकणाऱ्या तत्कालीन अन्न औषध प्रशासन अधिकारी मंगेश मल्हार लवटे याच्याविरोधात आज येथे गुन्हा दाखल झाला. लवटे सध्या सोलापूर येथे कार्यरत आहे.

याबाबत वसीम खुदबुद्दीन शेख (वय ४२, रा. जयसिंगपूर, शिरोळ) यांनी महाराष्ट्र उप लोकायुक्तांकडे तक्रार अर्ज दिला होता. पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात लवटेविरोधात गुन्हा नोंद झाला.

गुन्ह्यातून नाव वगळतो

कारवाईबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी मंगळवेढा येथे १७ एप्रिल २०२३ ला गुटखा वाहतूक करणारी गाडी पकडण्यात आली होती. याबाबत ‘मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होणार असून यातून नाव वगळतो,’ असा मेसेज कोल्हापूर कार्यालयाकडील तत्कालीन अन्न व औषध प्रशासन अधिकारी लवटे याने हॉटेल व्यावसायिक वसीम शेख यांना पाठवला. या प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी गळ घालत कर्नाटकातील गुटखा व्यापाऱ्याकडून १५ लाख रुपये मिळवून दे, असे बजावण्यात आले होते.

food drug
Jalna bribery case : पंचायत समितीत भ्रष्ट अधिकाऱ्यांचा धुमाकूळ; बिलं मंजूरीसाठी थेट गटविकास अधिकाऱ्यासमोरच पैशांचा व्यवहार, धक्कादायक VIDEO आला समोर

व्हॉटस्‌अप कॉलचे केले रेकॉर्डिंग....

लवटेने कारवाईचा धोका टाळण्यासाठी व्हॉटस्‌अप कॉलचा आधार घेतला होता; पण शेख यांनीही या संभाषणाचे दुसऱ्या मोबाईलआधारे रेकॉर्डिंग करून ठेवले होते. लवटेने वारंवार फोन करून कर्नाटकातील व्यापाऱ्यांकडून पैसे मिळवून दे; अन्यथा तुझ्यावर गुन्हा दाखल करणार, असे धमकावले. स्वतः पुढे न होता हॉटेल व्यावसायिक शेखतर्फे कर्नाटकातील व्यापाऱ्यांकडे पैसे मागण्याचा फंडा लवटेने अवलंबला होता.

वरिष्ठ कार्यालयाकडे अर्ज....

शेख यांनी याबाबत महाराष्ट्र उप लोकायुक्तांकडे तक्रार अर्ज दिला होता. तो अर्ज चौकशीसाठी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देण्यात आला. यावरून शेख व लवटे याच्यातील व्हॉटस्‌अपवर झालेले संभाषणाचे रेकॉर्डिंग, त्याआधारे बनविण्यात आलेली संभाषणाची स्क्रिप्ट, व्हिडिओ क्लिप, व्हॉटस्‌अप कॉलिंगचे स्क्रीनशॉट असे पुरावे एकत्रित करण्यात आले.

फोनवरूनच तोडपाणी....

लवटे कोल्हापूर येथे अन्न व औषध प्रशासन विभागात अधिकारी होता. कारवाई मंगळवेढ्यात झाली होती. या प्रकरणात हॉटेल व्यावसायिक शेखने मध्यस्थी करावी, यासाठी दबाव टाकण्यात आला. ‘दोनशे-तीनशे बॅग गुटखा आहे, तुम्ही सांगताना पंधरा सांगा, दहाला विषय क्लोज होईल. निगोसेशन करून आसपास तुटतंय’ असा संवाद पोलिसांना मिळाला. फोनवरूनच हे तोडपाणी झाले असून भारतीय साक्ष अधिनियम कलम ६३ (४) अंतर्गत प्रमाणिक करून घेण्यात आले.

food drug
Bribery Case : एक कोटी 20 लाख रुपयांच्या लाच प्रकरणात कोर्टाने घेतला मोठा निर्णय, सहआयुक्तांचा मुक्काम तुरुंगातच! 'हे' ठरले निमित्त!

FAQs :

1. या प्रकरणात कोणावर आरोप आहे?
FDA अधिकारी मंगेश लवटे यांच्यावर आरोप आहे

2. किती रकमेची लाच मागितल्याचा आरोप आहे?
15 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे

3. तक्रार कुणाकडे करण्यात आली होती?
महाराष्ट्र उप लोकायुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती

4. गुन्हा कुठे दाखल झाला?
लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला

5. पुढील प्रक्रिया काय आहे?
पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com