Shivsena Crises : उबाठाचा व्हिडिओ बॉम्ब! शिंदेंच्या आमदाराचा नगरसेवकाचा कॅसिनो व्हिडिओ व्हायरल, ठाकरेंच्या शिलेदाराने केली राजीनाम्याची मागणी

Ravikiran ingawale on ruturaj kshirsagar casino video row : उद्धव ठाकरेंच्या शिवसेना जिल्हाप्रमुखाने शिंदेंच्या आमदाराच्या नगरसेवकावर व्हिडिओ बॉम्ब टाकत खळबळ उडवून दिली आहे.
Kolhapur Shivsena Ruturaj Kshirsagar casino video controversy latest news; Eknath Shinde
Kolhapur Shivsena Ruturaj Kshirsagar casino video controversy latest news; Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Shivsena Vs Shivsena UBT News : कोल्हापुरातील ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आज व्हिडिओ बॉम्ब टाकत शिंदेसेनेची नेते व राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नगरसेवक मुलाचा कॅसिनोत गेम खेळतांना व्हिडिओ जारी केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

सामाजिक भान विसरून लोकप्रतिधीनी असे कर्म केल्याने लोकांनी आणि तरुणांनी यांच्याकडून काय आदर्श घ्यायचा असा सवाल करत नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांचा राजीनामा घ्यावा. अशी मागणी केली आहे. कोल्हापुरात पत्रकार परिषद घेत गौप्यस्फोट केला आहे.

राजेश क्षीरसागर यांचे मोठे चिरंजीव ऋतुराज क्षीरसागर हे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक आहेत. ऋतुराज क्षीरसागर यांचा कॅसिनोमधील व्हिडिओ ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले यांच्या हाती लागला. इंगवले यांनी आज पत्रकार परिषद घेत त्या स्क्रीनवर नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर हे कॅसिनो मध्ये बसून गेम खेळत असल्याचा व्हिडिओ सादर केला.

Kolhapur Shivsena Ruturaj Kshirsagar casino video controversy latest news; Eknath Shinde
Shivsena Crises : तटकरेंशी थोरवेंची गट्टी; नव्या समिकरणांचे शिवसेनेला हादरे; शिंदेंच्या आमदारावर आरोप करत बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

नगरसेवक असलेल्या ऋतुराज क्षीरसागर यांचा हे वर्तन कितपत योग्य आहे. वडिलांनी टक्केवारीतून मिळवलेला पैसा ऋतुराज क्षीरसागर कसे उडवतोय. हे जनतेने पाहायला हवं. ठाकरे सेनेच्या जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी गंभीर आरोप केला आहे.

Kolhapur Shivsena Ruturaj Kshirsagar casino video controversy latest news; Eknath Shinde
Shivsena Crisis : राजकारणात खळबळ! शिंदेंना बालेकिल्ल्यातच धक्का? शिवसेनेच्या ९ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार

राजेश क्षीरसागर यांच्याबाबत देखील लवकरच काही खुलासे करणार आहोत. नगरसेवक असलेल्या मुलाचे कारण आम्ही स्वतः आमदार राजेश क्षीरसागर यांनी जाहीर करावेत. जनतेचा पैशाची उधळपट्टी नगरसेवक मुलाकडून सुरू आहे. त्यामुळे तरुणांनी यांच्याकडून काय आदर्श घ्यावा. नगरसेवक असलेले ऋतुराज क्षीरसागर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com