Shivsena UBT : धक्कादायक! ठाकरेंच्या शिवसेनेत वाद उफाळला, जिल्हाध्यक्षाने शहराध्यक्षालाच दिली धमकी? 'उद्याचा दिवस बघू देणार नाही'

Shivsena UBT Call Recording Viral Political Row : जिल्ह्यात याआधी माजी आमदार ऋतुराज पाटील, शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांचे स्वीय सहाय्यक अभिजीत बुकशेट यांचे देखील संभाषण व्हायरल झाले असून त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती.
Shivsena UBT Leader call recording viral controversy
Shivsena UBT Leader call recording viral controversysarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापुरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील दोन नेत्यांच्या व्हायरल कॉल रेकॉर्डिंगमुळे नवे राजकारण सुरू झाले आहे. शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांचे स्वीय सहाय्यक अभिजीत बुकशेट, माजी आमदार ऋतुराज पाटील यांचे संभाषण व्हायरल झाल्यानंतर आता जिल्हाध्यक्ष रवीकरण इंगवले यांचे एक कॉल संभाषण व्हायरल झाले आहे.

ज्यात शहराध्यक्ष मंजीत माने यांना 'दोनदा तू वाचलास, माझ्याकडून वाचणार नाहीस, उद्याचा दिवस बघणार नाहीस' अशा शब्दात धमकी वजा इशारा देण्यात आला आहे. सध्या ठाकरेंच्या या दोन नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली असून वायरल झालेल्या संभाषणाबाबत शहराध्यक्ष माने यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून ठाकरेंच्या शिवसेनेतीव वाद चव्हाट्यावर आला आहे.

जिल्हाप्रमुख रविक्रण इंगवले यांनी चार दिवसापूर्वी शहराध्यक्ष मंजित माने यांना आपल्या सहकाराच्या मोबाईलवरून फोन केला. सुनील जोशी यांना तो इंगवले ची माणसं म्हणून कां बोलतोस? याचा जाब विचारला. यावर शहराध्यक्ष मंजीत माने यांनी जोशी यांना लाईनवर घ्या, असे सांगितले.

Shivsena UBT Leader call recording viral controversy
Shivsena UBT : कोकणात राजकीय भूकंप! 'MLC' त बाळ मानेंनी अर्ज मागे घेताच कारवाईचा बडगा; थेट पक्षातून हाकालपट्टी

त्यावर जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी यापूर्वी दोनदा तू वाचलास पण माझ्याकडून वाचणार नाहीस. उद्याचा दिवस बघणार नाहीस. तुझ्या आरुभाईला सांग. आदित्य साहेबांना तू फसवतोस. तुझी माझी भेट होणार आहे, अशा शब्दात खडसावले. इतकेच नव्हे तर पाच मिनिटात मी तुझ्या दारात येतो, असा दम देखील दिला.

यावर मंजीत माने यांनी देखील मीही दहा मिनिटात येतो. मी तुमच्या नादाला पहिल्यापासून लागत नाही. मी पक्षाचं काम प्रामाणिकपणे करतो, असे बोलताना वारंवार दिसले. यानंतर आता हे कॉल संभाषण चांगलेच व्हायरल झाले असून तो नेमका कोणी केला यावरून देखील दोघांमध्ये वाद सुरू आहे.

यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर कॉल कोणी व्हायरल केला. याबाबत परस्पर तक्रारी देण्याचे काम दोन दिवस सुरू आहे. अखेर शहराध्यक्ष मंजित माने यांनी सायबर पोलिसांकडे हा कॉल कोणी व्हायरल केला? या संदर्भात तक्रार दिली आहे. यामुळे पक्षातील वाद आता पोलिसांच्या दरबारी पोहचला आहे.

'हे' फक्त कारण? शहराध्यक्ष हाच कळीचा मुद्दा?

दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून हे संभाषण संपूर्ण राज्यभर व्हायरल झाले आहे. मात्र सुनील जोशी हे कारण असून यामागे शहराध्यक्ष पद हे कारण असल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये सुरू आहे. दोन ते तीन महिन्यांपूर्वी जिल्हाध्यक्ष यांनी स्वतःच्या लेटर हेडवर शहरातील कार्यकारणी जाहीर केली होती. मातोश्रीच्या आदेशानुसार हे कार्यकारणी रद्द करण्यात आली. याच दरम्यान, माने यांची मातोश्रीवरून शहराध्यक्ष पदावर नियुक्ती झाली.

Shivsena UBT Leader call recording viral controversy
Shivsena UBT : ठाकरेंचा मध्यरात्री फडणवीसांना फोन अन् महापालिकेतील 'त्या' प्रस्तावाला तडकाफडकी स्थगिती, शिंदेसेनेला मोठा झटका

व्हायरल कॉल रेकॉर्डिंगमुळे पक्षाची बदनामी

दरम्यान वारंवार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये खटके उडताना दिसत आहेत. यापूर्वी देखील शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांचे स्वीय सहाय्यक अभिजीत बुकशेट यांना एका कार्यक्रमावरून जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी सुनावले होते.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील काँग्रेसचे नेते माजी आमदार ऋतुराज पाटील यांना देखील एका काँग्रेस पदाधिकाऱ्याची तक्रार केल्याचा संभाषण कॉल व्हायरल झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा ठाकरेंच्या जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष मध्येच जुंपली असल्याचा कॉल संभाषण व्हायरल झाल्याने राज्यस्तरावर पक्षाची बदनामी होत आहे. त्यामुळे दोघांनाही शांत राहण्याचं आव्हान वरिष्ठांकडून करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com