Raju Shetti : ऊस दराचा तिढा सुटणार? कारखानदारांकडून गुप्त बैठकीत 3800 रुपयांचा प्रस्ताव; अधिकच्या 200 रुपयांसाठी हमीपत्र देण्याचीही तयारी

कोल्हापुरात ऊस दरावरून शेतकरी संघटनांचे आंदोलन तीव्र झाले आहे. प्रतिटन ४५०० रुपयांच्या मागणीदरम्यान कारखानदारांनी राजू शेट्टी यांच्यासोबतच्या गुप्त बैठकीत ३८०० रुपयांचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे.
Sugarcane Workers
Sugarcane Workers Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Sugarcane News : कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दरावरून सुरू असलेला संघर्ष अद्याप थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. शेतकरी संघटनांनी प्रतिटन ४५०० रुपये दराची ठाम मागणी लावून धरल्याने कारखानदार आणि संघटनांमधील चर्चेतून अद्याप तोडगा निघालेला नाही. जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर झालेल्या दोन बैठका निष्फळ ठरल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनांचा भडका उडत आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, काही प्रमुख कार्यकर्ते आणि कारखानदार यांच्यात झालेल्या गुप्त बैठकीत कारखानदारांनी प्रतिटन ३८०० रुपये दर देण्याचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती समोर आली आहे.

खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील कारखानदार, लोकप्रतिनिधी आणि शेतकरी संघटनांच्या प्रमुखांची रात्री उशिरा अज्ञातस्थळी बैठक झाली. या बैठकीत कारखानदारांनी प्रतिटन ३८०० रुपये दर देण्याची तयारी दर्शवली. तसेच साखरेला प्रतिक्विंटल ४५०० रुपये दर मिळाल्यास शेतकऱ्यांना प्रतिटन आणखी २०० रुपये देण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला. विशेष म्हणजे, साखरेला अपेक्षित दर मिळाल्यानंतर ही अतिरिक्त रक्कम देण्याबाबत सर्व कारखानदार हमीपत्र देण्यासही तयार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह जिल्ह्यातील अन्य शेतकरी संघटनांची मागणी यापेक्षा अधिक आहे. प्रतिटन ४५०० रुपये दर आणि त्याशिवाय आणखी ५०० रुपये द्यावेत, अशी भूमिका संघटनांनी घेतली आहे. मागणी मान्य झाल्याशिवाय जिल्ह्यातील साखर कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही, असा इशाराही संघटनांनी दिला आहे. त्यामुळे कारखानदारांच्या ३८०० रुपये आणि अतिरिक्त २०० रुपयांच्या प्रस्तावावर शेतकरी संघटना काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

Sugarcane Workers
Shivaji University : शिवाजी विद्यापीठातील 'त्या' विभागप्रमुखांना दणका : व्हॉट्सॲपवर परीक्षा घेण्याच्या प्रकाराची चौकशी होणार; कुलगुरुंकडून समिती स्थापन

दरम्यान, शेजारील कर्नाटक राज्यात प्रतिटन ३५०० ते ३६०० रुपये ऊसदर दिला जात आहे. सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू झाले असून, तेथे आतापर्यंत जवळपास सहा ते सात लाख टन उसाचे गाळप झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने सुरू नसल्याने सांगली जिल्ह्यातील आणि कर्नाटकातील कारखानदार जिल्ह्यातील ऊस घेऊन जात आहेत. त्यामुळे कोल्हापूरमधील शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचा मुद्दा कारखानदारांनी बैठकीत मांडल्याचे समजते.

Sugarcane Workers
Gokul Election News: मोठी बातमी: महायुतीच्या 12 संचालकांना कोर्टासमोर बाजू मांडण्याचे निर्देश,गोकुळचे अध्यक्षपद कायदेशीर कचाट्यात अडकले

कारखाने सुरू झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान टळू शकते, त्यामुळे कारखानदारांच्या प्रस्तावाला संघटनांनी सहमती द्यावी, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आल्याची माहिती आहे. आता या प्रस्तावावर शेतकरी संघटना काय निर्णय घेतात आणि ऊस दराचा तिढा सुटतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.