Shivsena MP : 'दहीहंडीला जाता, आंदोलनस्थळी यायला तुम्हाला वेळ नाही का?', खासदार धैर्यशील मानेंनादेखील मराठ्यांनी सोडलं नाही

Wathar Vadgaon Villagers Angree On MP Dhairyasheel Mane : कोल्हापूर जिल्ह्यातील वाठार तर्फे वडगाव गावातील जमिनीचा प्रश्न ऐरणीवर आला असून गेल्या पंधरा दिवसापासून ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे.
MP Dhairyasheel Mane
MP Dhairyasheel Manesarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. वाठार तर्फे वडगाव गावातील साडेसात एकर जमिनीच्या वादावर ग्रामस्थांनी १५ ऑगस्टपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.

  2. ग्रामस्थांचा आरोप आहे की या जमिनीवर राजकीय हस्तक्षेप होत असून जमीन शिक्षण मंडळाला भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे.

  3. खासदार धैर्यशील माने गावात न आल्याने ग्रामस्थांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त करत फटकारले आहे.

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील वाठार तर्फे वडगाव गावातील साडेसात एकर जमीन बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेला भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. ही जमीन मिळवण्यासाठी काही राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप सुरू आहे. त्याची कुणकुण लागताच समस्त ग्रामस्थांनी जमीन ताब्यात घेण्यासाठी १५ ऑगस्टपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. ‘दहीहंडीच्या कार्यक्रमाला जायला तुमच्याकडे वेळ आहे; मात्र, वाठार तर्फे वडगावमध्ये येऊन उपोषणाची दखल घ्यायला वेळ नाही. आम्ही निवडणुकीत तुमच्यासाठी रॅली काढली, मतदान केले; पण तुम्ही गावात फिरकायलाही तयार नाही,’ अशा शब्दांत आज ग्रामस्थांनी खासदार धैर्यशील माने यांना सुनावले. यावेळी आमदार अशोक माने, माजी आमदार राजू आवळे, राजीव आवळे, शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले उपस्थित होते.

‘दहीहंडीच्या कार्यक्रमाला जायला तुमच्याकडे वेळ आहे. मात्र, त्यांना वाठार तर्फे वडगावमध्ये येऊन उपोषणाची दखल घ्यायला वेळ नाही. तुमच्या निवडणुकीत आम्ही रॅली काढून तुम्हाला मतदान केले. पण, तुम्ही गावात फिरकला सुद्धा तयार नाही’ अशा शब्दांत आज ग्रामस्थांनी खासदार धैर्यशील माने यांना सुनावले. जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात झालेल्या बैठकीमध्ये ग्रामस्थांनी खासदार, आमदार यांना धारेवर धरले.

MP Dhairyasheel Mane
Dhairyasheel Mane : संजय राऊतांची वैचारिक दिवाळखोरी आधी थांबवावी, खासदार मानेंनी ठाकरेंची सेना का संपतेय? याचं कारणचं सांगितलं

यावेळी महेंद्र शिंदे म्हणाले, ‘आम्ही पहिल्यांदा हा प्रश्न घेऊन खासदार माने यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी याप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर बैठक घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, ही बैठक झालीच नाही. गावातून माझ्यामुळे तुम्हाला लिड मिळाले त्यामुळे अधिकाराने विचारण्याचा मला अधिकार आहे.’

यावर खासदार माने म्हणाले, ‘मी दिल्लीमध्ये अधिवेशनात होतो. त्यामुळे बैठक घेता आली नाही. मात्र, मी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.’ त्यानंतर ग्रामस्थांनी याला आक्षेप घेत माने यांना चांगलेच धारेवर धरले.

MP Dhairyasheel Mane
Dhairyasheel Mane : 'कुणाल कामरा जोकर कॉमेडियन, गांजा भूत जे देतो ते...', शिंदेंच्या खासदारानं संसद दणाणून सोडली

FAQs :

प्र.१: वाठार तर्फे वडगावमध्ये आंदोलन का सुरू झाले आहे?
👉 साडेसात एकर जमिनीच्या वादावर ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे.

प्र.२: ही जमीन कोणाला देण्यात आली आहे?
👉 बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेला भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे.

प्र.३: ग्रामस्थांचा मुख्य आरोप काय आहे?
👉 जमिनीवर राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप होत असल्याचा आरोप आहे.

प्र.४: ग्रामस्थांनी खासदार धैर्यशील माने यांच्यावर काय टीका केली?
👉 दहीहंडीला वेळ आहे पण गावात यायला वेळ नाही, असे म्हणत ग्रामस्थांनी त्यांना फटकारले.

प्र.५: आंदोलन कधीपासून सुरू झाले आहे?
👉 आंदोलनाची सुरुवात १५ ऑगस्टपासून झाली असून ते बेमुदत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com