Kolhapur Politics: जिल्हा परिषदेत स्वबळाची चाचपणी; कोल्हापुरात महायुती अन् आघाडीत 'टफ फाईट'

Local Body Elections 2025 : विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीत येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांकडे इच्छुक उमेदवारांची भाऊ गर्दी वाढली आहे. त्यामुळे प्रत्येकाला कार्यकर्ता जपण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे नेत्यांपुढे उमेदवारीचे आव्हान निर्माण झाले आहे.
Kolhapur ZP
Kolhapur ZPSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्वच राजकीय पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (Local Body Elections) निवडणुका प्रत्येक जिल्ह्यात एकत्र लढवायच्या घोषणा करत असले तरी कोल्हापूर जिल्ह्यात मात्र स्वतंत्र लढण्याची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी ठेवली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय पक्षापेक्षा गटातटाला महत्त्व असल्याने ते उमेदवाराच्या ताकतीचा उपयोग सर्वच पक्षांकडून केला जाणार आहे. त्यामुळे स्वतंत्र लढण्यावर काही नेत्यांचा प्रयत्न आहे. महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून निवडणूक स्वातंत्र्य लढवायची आणि निकालानंतर आघाडी किंवा युती करून सत्ता स्थापन करण्याची रणनीती कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा परिषदेमध्ये आखली जात आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातील पुनर्रचना होणार या दास्तीने अनेकांनी 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतली होती. मात्र, या मतदारसंघाची पुनर्रचना न होता थेट आरक्षण निश्चित होणार आहे. 2012 आणि 2017 च्या निवडणुकीचे आरक्षण वगळून इतर मतदारसंघावर आरक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे मागील निवडणुकीतील राजकीय अंदाज घेऊन अनेक इच्छुक कामाला लागले आहेत.

Kolhapur ZP
Maharashtra IPS Transfer: CM फडणवीसांचं धक्कातंत्र सुरुच, पुन्हा 8 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रवींद्र शिसवेंवर मोठी जबाबदारी

मागील निवडणुकीतील परिस्थिती पाहता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचा वर्चस्व राहिले आहे. भाजपचेही तेच तेच सदस्य जिल्हा परिषदेच्या सभागृहात होते. मात्र जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि स्वाभिमानी एकत्र आल्याने काँग्रेसच वरचढ ठरले.

एकदा पक्ष राजकीय पक्षांची भाऊगर्दी वाढली आहे. महायुती मधील भाजप शिंदेंची शिवसेना, राष्ट्रवादी, जनसुराज्य शक्ती हे चार पक्ष स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेत आहेत. तर महाविकास आघाडी मधील काँग्रेस,राष्ट्रवादी आणि ठाकरे यांची शिवसेना मतदार संघाानुसार आघाडी तर ज्या मतदारसंघात उमेदवारीची गोची होईल तिथे स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवली आहे.

Kolhapur ZP
MLA Kiran Lahamte Car Accident: मोठी बातमी: अजितदादांच्या लाडक्या आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची समोरासमोर धडक

विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीत येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांकडे इच्छुक उमेदवारांची भाऊ गर्दी वाढली आहे. त्यामुळे प्रत्येकाला कार्यकर्ता जपण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे नेत्यांपुढे उमेदवारीचे आव्हान निर्माण झाले आहे.

तर दुसरीकडे काँग्रेस वगळता राष्ट्रवादी आणि ठाकरे यांच्या शिवसेने पुढे नेतृत्व नाही. कार्यकर्ता आणि पदाधिकारी शोधण्याची वेळ नेतृत्वा पुढे आले आहे. त्याची संपूर्ण जबाबदारी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्यावरच असणार आहे. पण वास्तविक पाहता शक्य तिथे एकत्र आणि जिथे अडचण होईल तिथे स्वतंत्र लढण्याची तयारी महाविकास आघाडीची आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com