Kolhapur News : हसन मुश्रीफ-आबिटकरांच्या माघारी निधीवरून महायुतीत बंड : 68 पैकी 50 झेडपी सदस्य एकवटले

Kolhapur Zilla Parishad fund dispute : कोल्हापूरमध्ये जिल्हा परिषदेच्या विकास निधीवरून आमदार आणि झेडपी सदस्यांमध्ये वाद चिघळला आहे. या राजकीय घडामोडींचे ताजे अपडेट्स वाचा.
kolhapur zp
Kolhapur ZPSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur ZP News : महायुतीतील आमदार आणि जिल्हा परिषद सदस्य आता निधीच्या मुद्द्यावर आमनेसामने आले आहेत. जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) आणि जिल्हा परिषदेच्या विकास निधीवरून सुरू झालेल्या वादाने आता उघड संघर्षाचे रूप धारण केले आहे. विशेष म्हणजे, या प्रश्नावर महायुतीच्या सदस्यांनाच महाविकास आघाडीच्या सदस्यांनीही पाठिंबा दिला आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या निधीवर आमदारांचे वर्चस्व वाढत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांच्या अधिकारांवर गदा येत आहे, असा दावा करत मतदारसंघातील विकासकामांसाठी उपलब्ध असलेल्या निधीवर जिल्हा परिषद सदस्यांना १०० टक्के अधिकार मिळावेत, अशी मागणी सदस्यांनी केली आहे.

kolhapur zp
Shehzad Poonawalla : काँग्रेसमधून राजकीय इनिंग, भाजपमध्ये महत्त्वाची जबाबदारी अन् आता राजीनामा! कोण आहेत शेहझाद पूनावाला?

या मागणीसाठी जिल्हा परिषदेतील ६८ पैकी सुमारे ५० सदस्यांनी एकत्र येत अध्यक्षा शिल्पा खोत यांना निवेदन दिले. या निवेदनामुळे जिल्हा परिषदेत 'लेटर बॉम्ब' पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या महिनाभरापासून हा वाद अंतर्गत पातळीवर धुमसत होता. मात्र आता तो उघडपणे समोर आला आहे.

सध्या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ सध्या मुंबईत असताना कोल्हापुरात निधीच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापले आहे. ते दोघेही जिल्ह्यात परतातच हा मुद्दा आणखी तापणार आहे.

राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, जिल्हा नियोजन समितीच्या निधीतील किमान ५० टक्के वाट्यावर आमदार दावा सोडण्यास तयार नाहीत, तर दुसरीकडे जिल्हा परिषद सदस्य संपूर्ण अधिकाराची मागणी करत आहेत. त्यामुळे या वादावर दोन्ही मंत्र्यांची भूमिका काय असणार आणि महायुतीतील हा अंतर्गत संघर्ष कसा मिटणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com