

Gokul Election 2026 : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड अर्थात 'गोकूळ'च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असून सर्वात कमी जागा जनसुराज्य पक्षाला देण्यात आल्या आहेत. यामध्ये भाजप आणि शिवसेनेला समान जागांचं वाटप करण्यात आलं आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आजच्या जागा वाटपाच्या बैठकीनंतर याची अधिकृत घोषणा केली. गेल्या सहा महिन्यांपासून या निवडणुकीवरुन महायुतीमध्ये कडवटपणा आला होता. पण आता जागा वाटप झाल्यानं शेवट गोड झाल्याची भावना चंद्रकांत पाटलांनी बोलून दाखवली आहे.
गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप जाहीर करण्यात आलं आहे. जागा वाटपाबाबत आज महायुतीच्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सर्व मतभेद दूर करण्यात यश आलं. या बैठकीला शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील आमदार विनय कोरे, समित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीनंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केल्यानुसार, महायुतीतील घटक पक्षांना अनुक्रमे राष्ट्रवादी काँग्रेस - ९, भाजप - ७, शिवसेना - ७ आणि जनसुराज्य - २ जागा देण्यात आल्या आहेत. यानंतर मंत्री हसन मुश्रीफ हे उमेदवारांच्या नावांची यादी ट्विटद्वारे जाहीर करणार आहेत.
दरम्यान, बैठकीतील चर्चेबाबत सांगताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड, आज उमेदवारीबाबत चर्चा झाली. महायुतीत जे मतभेद व्हायला नको होते ते झाले पण आता सगळे मिटले आहेत. प्रत्येकाने आपले उमेदवार निवडले आहेत. शुक्रवारी सर्व उमेदवार आई अंबाबाईचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करणार आहेत. महासैनिक दरबारला मोठा प्रचार सांभारंभ होईल, अशीही माहिती चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.