Kolhapur Politics: कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाचीही खांडोळी? महायुतीत अध्यक्षपद वाटून घेण्याच्या हालचाली

Kolhapur ZP President 2026: कोल्हापूर महानगरपालिकेत महापौर पद जसे सव्वा वर्षाचे ठरवण्यात आले त्याच पद्धतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देखील सव्वा वर्षाचे राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीच्या सर्वाधिक जागा असल्याने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे पहिल्यांदा राष्ट्रवादीकडे अध्यक्षपद घेतील.
Kolhapur Zilla Parishad Election Results 2026
Kolhapur Zilla Parishad Election Results 2026Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 12 Feb : कोल्हापूर महानगरपालिकेत ज्या पद्धतीने महापौरपदाची खांडोळी करण्यात आली त्याच पद्धतीने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची देखील खांडोळी करण्याच्या हालचाली महायुतीच्या गोटामध्ये सुरू आहेत.

सर्वच कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी महायुतीच्या नेत्यांची रविवारी बैठक होण्याची शक्यता आहे. तसेच येत्या 23 फेब्रुवारी रोजी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड जाहीर होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक जागा घेतल्या असल्या तरी प्रथमतः राष्ट्रवादीला अध्यक्ष पद त्यानंतर भाजप आणि शिवसेनेला अध्यक्षपद देण्याच्या हालचाली सुरू आहेत.

कोल्हापूर महानगरपालिकेत महापौर पद जसे सव्वा वर्षाचे ठरवण्यात आले त्याच पद्धतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देखील सव्वा वर्षाचे राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीच्या सर्वाधिक जागा असल्याने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे पहिल्यांदा राष्ट्रवादीकडे अध्यक्षपद घेतील त्यानंतर भाजप आणि शिवसेनेला हे अध्यक्ष पद दिले जाण्याची शक्यता आहे.

महायुतीचे सर्व नेते रविवार, १५ फेब्रुवारी समित्यांच्या नाव निश्चितीसाठी एकत्र बैठक घेणार आहेत. कोल्हापूर महानगरपालिका संदर्भात ही बैठक असली तरी याच बैठकीत जिल्हा परिषदेबाबत प्राथमिक चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यावेळी जो फॉर्म्युला ठरेल त्यानुसार पुढची प्रक्रिया पार पडेल. ज्या पक्षाला जे पद येईल त्यानुसार ती नावे संबंधित पक्षाकडून निश्चित केली जातील असे सांगितले जाते.

Kolhapur Zilla Parishad Election Results 2026
Budhwar Peth Pune :बुधवार पेठेत 12 वाजता नाकाबंदी 683 पोलीस अन हाताला लागले 700 जण.. ऑपरेशन बाबत पोलीस अधिकाऱ्यांनी दिली धक्कादायक माहिती

जिल्हा परिषदेत सर्वाधिक २० जागा जिंकून राष्ट्रवादी अजित पवार पक्ष मोठा ठरला आहे. त्या खालोखाल भाजप आणि शिवसेनेला जागा मिळाल्या आहेत. संख्या बळाचा विचार करता पहिला अध्यक्षपदाचा मान राष्ट्रवादीलाच मिळेल यात शंका नाही. तथापि महापालिकेप्रमाणे महायुतीतील सर्वच घटक पक्षांना अध्यक्षपदावर संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

आता अध्यक्षपद राष्ट्रवादीला दिले तर उपाध्यक्षपद भाजपकडे जाईल. जनसुराज्य व यड्रावकर यांची आघाडी महायुतीसोबत आल्यास त्यांना महत्त्वाचे सभापतिपद द्यावे लागेल. त्याचप्रमाणे पहिल्या टर्ममध्ये शिवसेनेकडून बांधकाम आणि महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतिपदाचा आग्रह असल्याचा बोलले जाते.

Kolhapur Zilla Parishad Election Results 2026
Junnar Panchayat Samiti : भाजपच्या एका सदस्याच्या हाती सत्तेची चावी : सभापतीपदासाठी शिवसेना अन् राष्ट्रवादी फिल्डिंग; एकाची करावी लागणार निवड

शुक्रवारी (ता. १३) राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार होणार आहे. त्याच दिवशी किंवा महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून शनिवारी किंवा रविवारी याबाबत बैठक घेऊन प्राथमिक चर्चा होईल. या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर पुन्हा होणाऱ्या बैठकीत नावांसह पद वाटपाचा फॉर्म्युला अंतिम होईल, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com