Kolhapur Loksabha Constituency : शाहू महाराजांच्या उमेदवारीवर मंत्री खाडे म्हणाले, ‘जिथं मोदी आहेत, तिथं मुमकीन काही नाही'

Mahayuti News : छत्रपती आमच्या लाइनमध्ये नाहीत, त्यामुळे मी तिथं काय बोलणार. प्रत्येकाच्या भावना आहेत, प्रत्येकाचे पक्ष आहेत. प्रत्येकाच्या पक्षाप्रमाणे ठेवण होते. त्याप्रमाणे त्यांची सध्या तयारी दिसते आहे.
Shahu Maharaj-Suresh Khade
Shahu Maharaj-Suresh KhadeSarkarnama

Pandharpur News : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे, त्यामुळे महायुतीनेही आपला उमेदवार बदलल्याची चर्चा आहे. कोल्हापूरमधील शाहू महाराजांच्या उमेदवारीवर राज्याचे कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी भन्नाट विधान केले आहे. ‘जिथं मोदी आहेत, तिथं विरोधकांना मुमकीन काही नाही,’ त्यामुळे कोल्हापूर आम्हीच जिंकणार, असा दावाही त्यांनी केला.

अखिल भारतीय मजूदर संघाचे 24 वे अधिवेशन पंढरपूर येथे सुरू आहे, त्याला भेट देण्यासाठी राज्याचे कामगारमंत्री सुरेश खाडे आज (ता. ९ मार्च) पंढरपूरमध्ये आले होते. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्या उमेदवारीवर भाष्य केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shahu Maharaj-Suresh Khade
Manoj Jarange Patil News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठ्यांशी गद्दारी केलीय; मनोज जरांगेंनी तोफ डागली

सुरेश खाडे म्हणाले, छत्रपती आमच्या लाइनमध्ये नाहीत, त्यामुळे मी तिथं काय बोलणार. प्रत्येकाच्या भावना आहेत, प्रत्येकाचे पक्ष आहेत. प्रत्येकाच्या पक्षाप्रमाणे ठेवण होते. त्याप्रमाणे त्यांची सध्या तयारी दिसते आहे. जिथं मोदी आहेत, त्या ठिकाणी विरोधकांना मुमकीन काय नाही. त्यामुळे कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Loksabha) मतदारसंघातून महायुतीचाच उमेदवार जिंकेल.

विरोधक काही तरी बोलत असतात, त्यावर आपण लक्ष द्यायचं नाही. लोकसभेच्या जागा चारशे पार करण्यावर आमचे लक्ष्य आहे. जागावाटप करायला आपल्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे खालेली माणसे वर आहेत. त्यांना देशाची, राज्याची काळजी आहे. पण, येत्या दोन ते तीन दिवसांत महायुतीचे जागावाटप होईल, असे खाडे यांनी सांगितले.

Shahu Maharaj-Suresh Khade
Solapur Loksabha Constituency : भाजपचा आणखी एका नेता सोलापुरातून लोकसभा लढण्यासाठी तयार; ‘पक्षाने आदेश दिला, तर...’

आव्हान द्यायला त्यांच्याकडे राहयलंय काय?

केवळ सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांतच भाजपला चांगले वातावरण आहे, असे नव्हे तर संपूर्ण देशात पक्षासाठी चांगले वातावरण आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे ३७० आणि मित्रपक्षासहित ‘एनडीए’चे चारशेपेक्षा जास्त खासदार निवडून येतील, असा विश्वाही सुरेश खाडे यांनी व्यक्त केला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आम्हाला अजिबात आव्हान नाही. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, अजितदादा, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आहेत, त्यामुळे आमच्यापुढे कोणाचेही आव्हान नाही. आव्हान द्यायला त्यांच्याकडे राहयलंय काय?

R

Shahu Maharaj-Suresh Khade
Shivsena Shakha Inauguration ठाकरे गटाला मिळालं आयतंच कोलित...मुंबईत भाजप मंत्र्यांच्या हस्ते शिवसेना शाखेचे उद॒घाटन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com