Solapur Loksabha : सोलापूर लोकसभेसाठी सातपुते, डेप्युटी कलेक्टरसह चौघे फेव्हरेट; भाजप पदाधिकाऱ्यांनी निरीक्षकांना सुचविली नावे

Lok Sabha Election 2024 : उमेदवारीसंदर्भात आढावा घेण्यासाठी पक्षाकडून तब्बल १२० पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. मोहोळ आणि गाडगीळ यांनी मतदारसंघनिहाय लोकसभा उमेदवारीबाबत पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली.
Sharad Bansode-Ram Satpute-Amar Sable
Sharad Bansode-Ram Satpute-Amar SableSarkarnama

Solapur Political News : भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे. सोलापूर मतदारसंघातील उमेदवारासंदर्भात पक्षाचे निरीक्षक पाठवून भाजपने चाचपणी केली. त्यामध्ये भाजपच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांनी माळशिरसचे आमदार राम सातपुते, माजी खासदार अमर साबळे, माजी खासदार शरद बनसोडे आणि उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांचेही नाव सुचविले आहे. मात्र, काहींनी स्थानिक उमेदवार द्या, मग तो कोणीही असू द्या, अशी गळ निरीक्षकांना घातली आहे. निरीक्षक आपला अहवाल आज पक्षश्रेष्ठींना देणार आहेत.

भाजपचे (BJP) निरीक्षक तथा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील (Solapur Lok Sabha constituency) उमेदवाराबाबतचा आढावा घेण्यासाठी सोलापुरात आले होते. उमेदवारीसंदर्भात आढावा घेण्यासाठी पक्षाकडून तब्बल १२० पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. मोहोळ आणि गाडगीळ यांनी मतदारसंघनिहाय लोकसभा उमेदवारीबाबत पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. तसेच, लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावाही घेण्यात आला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि सुधीर गाडगीळ (Sudhir Gadgil) यांचे भाजपचे सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी स्वागत केले. पदाधिकाऱ्यांनी पक्षनिरीक्षकांपुढे आमदार राम सातपुते, माजी खासदार साबळे, माजी खासदार शरद बनसोडे, उपजिल्हाधिकारी वाघमारे यांची नावे सुचविल्याची माहिती सूत्रांनी दिली. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी, आमदार विजयकुमार देशमुख, नगरसेवक नारायण बनसोडे यांचेही नाव काहींनी सुचविल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, सोलापूर लोकसभेसाठी राम सातपुते (Ram Satpute) यांचे नाव पहिल्यापासून चर्चेत आहे. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत. त्यामुळे सातपुते यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगण्यात येते. नवा आणि फ्रेश चेहरा असल्यामुळे पक्षाकडूनही सातपुते यांना पसंती मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Sharad Bansode-Ram Satpute-Amar Sable
Geete Challenge to Tatkare : अनंत गीतेंचे सुनील तटकरेंना खुलं चॅलेंज; ‘हिम्मत असेल माझ्याविरोधात लोकसभा लढवा’

पक्षाचे निरीक्षक मुरलीधर मोहोळ, आमदार सुधीर गाडगीळ यांना भेटण्यासाठी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, राजू माने, विश्रांत गायकवाड, व्यंकटेश्वर स्वामी हे इच्छुकही आले होते. निरीक्षकांनी त्यांना केवळ भेट दिली. मात्र, उमेदवारीसंदर्भात केवळ पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. काही इच्छुकांना तुमच्याशिवाय इतर नावे सांगा असले म्हटल्यावर सातपुते, साबळे, बनसोडे यांची नावे काहींनी सुचविली.

R

Sharad Bansode-Ram Satpute-Amar Sable
Lok Sabha Election 2024 : भाजपच्या निरीक्षकांनी विचारला ‘हा’ प्रश्‍न, अन् चिडले कार्यकर्ते !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com