Jayant Patil News: शरद पवारांची साथ सोडली, 'भाचे' तनपुरे भाजपमध्ये दाखल, 'मामा' जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया समोर; 'आमच्यासाठी हे धक्कादायक...'

Prajakt Tanpure BJP Joining: राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीनंतर राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या अहिल्यानगरमधील माजी आमदार प्राजक्त तनपुरेंचा भाजपप्रवेश पार पडला आहे. त्यांनी शरद पवारांच्या पक्षाला रामराम ठोकत कमळ हाती घेतलं आहे. अखेर त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता.30) भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांच्या विधानपरिषदेच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली आहे.
Prajakt Tanpure BJP Joining
Prajakt Tanpure BJP JoiningSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीनंतर राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या अहिल्यानगरमधील माजी आमदार प्राजक्त तनपुरेंचा भाजपप्रवेश पार पडला आहे. त्यांनी शरद पवारांच्या पक्षाला रामराम ठोकत कमळ हाती घेतलं आहे. अखेर त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता.30) भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांच्या विधानपरिषदेच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली आहे. याचदरम्यान, माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी 'भाचे' प्राजक्त तनपुरेंच्या भाजपप्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे.

आमदार जयंत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माजी आमदार व भाजपचं कमळ हाती घेतलेल्या प्राजक्त तनपुरेंवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश झाल्याचं मी काही वेळापूर्वी ऐकलं. माझा आणि त्यांचा काही संपर्क झालेला नाही. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणं आमच्यासाठी धक्कादायक असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.

जयंत पाटील म्हणाले, प्राजक्त तनपुरे यांनी भाजपप्रवेशाचा निर्णय हा त्यांच्या मतदारसंघातील परिस्थिती पाहून घेतलाय असंही मला वाटतं. त्यांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली की नाही, हे मला माहीत नाही. पण आपण प्राजक्त तनपुरे यांच्याशी संपर्क केला नसल्याचं माजी मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस गटातील वादावर माजी मंत्री आणि आमदार जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. राष्ट्रवादी पक्षांमधील वादाबद्दल मी बोलणार नाही. कशासाठी भांडायचं स्वातंत्र्य त्या पक्षातील लोकांना आहे. त्यांच्या स्वातंत्र्यावर मी कसं बोलणार. असा टोला लगवात अलीकडे टेंडर मिळवणे, घेणे असे प्रकार खूप वाढले आहेत. तुम्हाला कळलेल हे एक भांडण आहे अशी अनेक भांडण आहेत, असेही पाटील म्हणाले. ते कोल्हापूरात बोलत होते.

Prajakt Tanpure BJP Joining
MLC Election : अशोक खरात प्रकरणातील 'त्या' वादग्रस्त चेहऱ्याची विधान परिषदेच्या आखाड्यात एंट्री! पुण्यातून उमेदवारी? मोठ्या पक्षाकडून अर्ज नेल्याने....

मनोज जरांगे पाटील यांची सरकार सोबत त्यांच्या चर्चा सुरू होती. गेल्या 10 महिन्यांत सरकारने ने काय केलं काय नाही? याची माहिती सरकार त्यांना देईल अशी अपेक्षा आहे. सरकारने जरांगे यांचं समाधान करायला हरकत नाही. आचारसंहिता असल्याने मी या प्रकरणात तपशीलवार बोलणं योग्य वाटत नसल्याचं आमदार जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

ओबीसी आणि मराठा हा संघर्ष वाढता कामा नये. दोघांचं संतुलन ठेऊन निर्णय झाला पाहिजे. जरांगे पाटील यांना सरकारने काय आश्वासन दिलं माहीत नाही. पण काही आश्वासन दिले असेल तर ते पूर्ण करावं, असेही आमदार पाटील म्हणाले.

Prajakt Tanpure BJP Joining
Konkan Politics : कोकणात राजकीय भूकंप! भाजपचा दोन्ही शिवसेनांना जबरदस्त धक्का, सरपंच आणि पंचायत समिती सदस्यांच्या हाती कमळ

अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, अर्ज भरणे वेगळे आणि निवडणूक लढवणं वेगळ. महायुतीमध्ये अनेकांनी अर्ज भरले असले तरी सत्ता असली की अनेक गोष्टी ऍडजेस्ट होऊन जातात. त्यामुळे माघारी दिवशीच चित्र कळेल.

सांगली सातारासाठी महाविकास आघाडी उमेदवार देणार आहे. ही जागा राष्ट्रवादीकडे आली आहे, असं मी ऐकलं. शशिकांत शिंदे सर्वांशी बोलून योग्य निर्णय घेतील. सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील म्हटले आहेत.

पक्ष कसा चालवायचा याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन असतो. पक्ष चालवण्यासाठी त्यांनी काही सहकार्याकडून अपेक्षा केली असेल तर तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मंत्र्यांकडे जाहीरपणे मदत मागायची की आतमध्ये मदत मागायची हा त्यांचा प्रश्न आहे. पक्षवाढीसाठी साठी त्यांचे जे अंतर्गत आराखडे आहेत. त्याप्रमाणे ते काम करत आहेत.

Prajakt Tanpure BJP Joining
Santosh Dehsmukh Case: 'धनंजय देशमुखांसोबत राहू नकोस, संतोष देशमुख प्रकरणात साक्ष देऊ नको; दादा खिंडकरला सख्ख्या भावाकडूनच धमकी!

'शक्तिपीठ'ला विरोधच

जुन्या अलाइनमेंट प्रमाणे महामार्ग झाला असता तर विरोध कमी झाला असता.रामटेक हे देखील एक मोठं देवस्थान आहे. भंडारा गोंदिया जिल्ह्यातील देवस्थानांना हा महामार्ग का जोडला जात नाही. शक्तिपीठ महामार्गाबद्दल पुन्हा विचार करा, अशी आम्ही सरकारला आग्रहपूर्वक विनंती केली आहे. हा रस्ता करायला लोकांनी मान्यता दिली तर नितीन गडकरी यांच्या खात्याला रस्ता करायला सांगावा म्हणजे तो स्वस्तात होईल, असा टोला जयंत पाटील यांना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com