Laxman Hake : लक्ष्मण हाकेंनी दाखवली मनोज जरांगे पाटलांसोबत एकत्र येण्याची तयारी; पण...

Manoj Jarange Patil News : ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारत मराठा आरक्षण ओबीसीमधून देण्याच्या भूमिकेवर टीका केली. त्यांनी ओबीसी प्रतिनिधित्वाला धोका असल्याचे सांगितले.
Laxman Hake-Manoj Jarange Patil
Laxman Hake-Manoj Jarange Patil Sarkarnama
Published on
Updated on
  1. ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करत म्हटले की चहापान किंवा फराळावरून ओबीसी- मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही; हा वैयक्तिक नव्हे तर सामाजिक हक्कांचा विषय आहे.

  2. हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला “बेकायदेशीर” म्हटले आणि सांगितले की त्यांच्या भूमिकेमुळे ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले असून ओबीसी समाज त्याला कडाडून विरोध करेल.

  3. हाके यांनी सरकारकडे पंचायतराज निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली आणि न्यायालयीन निर्णय होईपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, तसेच बोगस कुणबी प्रमाणपत्र तपासण्यासाठी ॲड. सदावर्ते यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला.

Solapur, 28 October : मराठा-ओबीसी प्रश्न सुटणार असेल तर आम्हाला मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत एकत्रित यायला आवडेल. पण जरांगे पाटील हे मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण हवं. एसईबीसी नको, ईडब्लूएस नको म्हणत असतील जे राज्यातील गरजवंत मराठ्यांच्या गरजेचे आहे. ते जर टाळणार असतील. राज्यातील ओबीसींचा सरपंच, पंचायत समिती सदस्य, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर जरांगेंच्या मागणीमुळे होणार नसेल तर पंकजाताई तुम्हाला हे आवडणारे आहे का? असा सवाल ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला.

मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांच्या सोबतची दरी मिटली पाहिजे, असे म्हणून पंकजा मुंडे यांनी जरांगे पाटील यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला होता. त्यावर बोलताना लक्ष्मण हाके यांनी पंकजा मुंडे यांनाच सवाल केले आहेत.

लक्ष्मण हाके (Laxman Hake) म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्यसोबतची दरी मिटवण्यासाठी फराळ किंवा चहापानावर संपेल इतका सोपा हा विषय नाही. जरांगे पाटील आमचे वैयक्तीक दुष्मन नाहीत, त्यामुळे आम्हाला देखील हे आवडेल. त्यांच्यासोबत चहापान करायला मी तर म्हणेल त्यांनी आमच्या घरी यावं किंवा आम्ही त्यांच्या घरी जाऊ किंवा मग पंकजाताई आणि जरांगे पाटील दोघांनी आमच्या घरी यावं, आमचं काही म्हणणं नाही.

चहापान किंवा फराळ करून ओबीसीचे प्रश्न संपणारे नाहीत, ओबीसींच्या प्रश्नाचं, आरक्षणाच्या धोरणचं काय? प्रश्न हा वैयक्तिक नाहीये, कोणाच्या लेकीबाळाचे लग्न नाही, ओबीसीच्या अधिकार, हक्काचा प्रश्न आहे, तो चहापानाने सुटणारा आहे का? त्यामुळे हे सगळं गोलमाल आहे. जरांगे यांची मागणीच बेकायदेशीर आहे. या मागणीला महाराष्ट्रमधला ओबीसी कडाडून विरोधच करेल.

Laxman Hake-Manoj Jarange Patil
Phaltan Doctor Death : ‘फडणवीससाहेब तुमच्याकडून फार अपेक्षा; आरोप असलेल्या व्यक्तीला क्लिनचिट देणं योग्य नाही’

ॲड गुणरत्न सदावर्ते यांनी बोगस कुणबी प्रमापणपत्र वाटपाबाबत जी मागणी केली आहे, त्याला माझा पाठिंबा आहे. फक्त सर्टिफिकेट नाही, तर अंतरवलीमध्ये बोगस कुणबी प्रमाणपत्र दिलं गेलं, त्यामुळे खऱ्या मेरीटपेक्षा कमी असलेला माणूस पोलिस पाटील होतोय. हा कुठेतरी शासनपुरस्कृत ओबीसी यांचे प्रतिनिधित्व डावलण्याचा प्रयत्न आहे, त्यामुळे सदावर्ते यांनी जी बोगस प्रमाणपत्र बाबतीत मागणी केली आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे, असे हाके यांनी स्पष्ट केले.

हाके म्हणाले, मनोज जरांगे यांनी काही बोललं तर 2 सप्टेंबरचा जीआर काढलाय, त्यामुळे ओबीसीची जी स्पर्धा आहे, त्यात मराठा समाजही उतरला आहे, त्यामुळे ओबीसी आरक्षण संपलेलं आहे, राज्यकर्त्या समाजाविरोधात ओबीसी टिकू शकत नाही, त्यामुळे जरांगे काहीही बोलले, शासन काही म्हटलं तरी ओबीसीच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे.

आम्ही सरकारला विनंती करतोय की पंचायतराज निवडणुका पुढे ढकला. गेली सात वर्षे निवडणूक घेत नाही, मग आता ओबीसी यांच्या समावेशाशिवाय तुम्हाला निवडणूक घ्यायच्या आहेत का?

Laxman Hake-Manoj Jarange Patil
Solapur BJP : दिलीप मानेंना विरोध करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्षांनी दिला ‘हा’ शब्द; मुख्यमंत्र्यांनीही दिली भेटीची वेळ

न्यायालयाने ओबीसी आरक्षण टिकवलं आहे, दुसरीकडे सरकारने जीआर काढून मराठा बांधवांना निवडणुकीत उभं राहण्याची संधी दिली आहे. न्यायालयातून सोक्षमोक्ष लागू द्या, तोपर्यंत एक वर्ष निवडणूक पुढे ढकला. मुख्यमंत्रीसाहेब, ओबीसी प्रतिनिधित्व शिवाय तुम्हाला निवडणूक करायचे आहे का? आम्ही संभ्रमात आहोत, निवडणुका पुढे ढकला, अशी मागणीही हाके यांनी केली.

1. लक्ष्मण हाके यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका का केली?
त्यांनी म्हटले की चहापानावरून मराठा-ओबीसी आरक्षणासारखा गंभीर प्रश्न सुटू शकत नाही.

2. हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीबाबत काय मत व्यक्त केले?
त्यांनी ती बेकायदेशीर असल्याचे सांगून ओबीसी समाज त्याला विरोध करेल असे स्पष्ट केले.

3. ॲड. सदावर्ते यांच्या मागणीला हाके यांनी काय प्रतिसाद दिला?
हाके यांनी बोगस कुणबी प्रमाणपत्रांच्या चौकशीच्या मागणीला पाठिंबा दिला.

4. हाके यांनी सरकारकडे कोणती मागणी केली?
न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत ओबीसींच्या सहभागाशिवाय पंचायत निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com