Satara ZP Election : भाजपला रोखणारा 'कराड पॅटर्न' साताऱ्यात गाजणार? शंभुराज देसाई, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, मकरंदआबा, पृथ्वीराजबाबा अन् उंडाळकर एकत्र येणार?

Karad Local Alliance Pattern : कराड पालिकेच्या यशानंतर भाजपला रोखण्यासाठी शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी व काँग्रेस जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत स्थानिक आघाडी पॅटर्न राबवण्याच्या हालचाली वेगाने सुरू आहेत.
Opposition party leaders discuss local alliance strategies after Karad municipal election results, aiming to replicate the model to challenge BJP in district-level elections.
Opposition party leaders discuss local alliance strategies after Karad municipal election results, aiming to replicate the model to challenge BJP in district-level elections.Sarkarnama
Published on
Updated on

Satara Karad News : कराड नगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांनी एकत्र येऊन स्थानिक आघाडीच्या माध्यमांतून बलाढ्य भाजपला रोखण्याची किमया करून दाखवली. यातून स्थानिक पातळीवर तडजोडी करून निवडणूक लढवली तर यश येते, हा विश्वास आल्याने नेत्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठीही स्थानिक आघाडीचा हा पॅटर्न जिल्हाभर राबवण्यासाठी शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्याला कितपत यश येणार? हे लवकरच समोर येईल.

जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी पाच फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यासाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला, तरीही निवडणुका या पक्षीय पातळीवर, स्वबळावर होणार, की महायुती आणि महाविकास आघाडीद्वारे लढवल्या जाणार? याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. मात्र, महायुतीतील भाजप, शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांसह इच्छुकांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे.

यावेळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलत असल्याचे दिसून आले आहे. कराड पालिकेची निवडणूक यावेळी वेगळ्या पॅटर्नने लढवली. मागील निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आणि यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव यांनी एकत्रित येत आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती.

Opposition party leaders discuss local alliance strategies after Karad municipal election results, aiming to replicate the model to challenge BJP in district-level elections.
Satara ZP Election: भाजपचे अतुल भोसले अन् राष्ट्रवादीचे उंडाळकर गट आमने सामने; ओबीसी- कुणबी आरक्षणामुळे लढत घाम काढणार

मात्र, यावेळी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवार दिले, तर माजी मंत्री बाळासाहेब पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई यांचे समर्थक यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव यांनी एकत्रित येत लोकशाही-यशवंत विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली.

यावेळच्या निवडणुकीत भाजपचे नेते आमदार डॉ. अतुल भोसले यांनी कमळाच्या चिन्हावर उमेदवार उभे करून स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, माजी मंत्री पाटील यांची लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव यांनी बाजी मारली.

Opposition party leaders discuss local alliance strategies after Karad municipal election results, aiming to replicate the model to challenge BJP in district-level elections.
Karad Politic's : कराडला स्वीकृत नगरसेवक होणार उपनगराध्यक्ष?; मातब्बर नेत्याचे नाव चर्चेत, नगरसेवकपदासाठी पराभूतांची फिल्डिंग

त्यामुळे स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून किंवा पक्षीय चिन्हावर तडजोड करून उमेदवार उभारल्यास ते निवडून येतात याचा विश्वास या नेत्यांना मिळाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही तोच पॅटर्न राबवल्यास यश मिळेल, या हेतूने शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याला कितपत यश येणार हे लवकरच समजेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com