Vinay Kore News : विनय कोरे रोखठोक; ‘लोकसभेला काही नको; पण विधानसभेला भाजपने मोठ्या भावाची भूमिका निभवावी’

Mahayuti-Jansuraj Shakti Party News : भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील नेत्यांनी लक्षात ठेवले पाहिजे, की जनसुराज्य शक्तीसारखा पक्ष केंद्रात मित्रपक्ष म्हणून केंद्राच्या धोरणांना पाठिंबा देतो, तेव्हा विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने मित्राची भूमिका मोठ्या भावाप्रमाणे निभावली पाहिजे.
Vinay Kore
Vinay KoreSarkarnama
Published on
Updated on

Sangli New : भाजपच्या महायुतीमध्ये काम करीत असताना केंद्र सरकारच्या धोरणांना वेळोवेळी जनसुराज्य शक्तीने पाठिंबा दिला आहे. लोकसभा निवडणुकीसाठीही मित्रपक्ष म्हणून महायुतीच्या पाठीशी ठामपणे आहे. सहयोगी पक्ष म्हणून आपली भूमिका प्रामाणिकपणे पार पाडत आहे. आता लोकसभेला नको. मात्र, विधानसभा निवडणुकीवेळी मोठ्या भावाची भूमिका पार पाडा. आमच्या पक्षाला सन्मानजनक जागा दिल्या पाहिजेत, असा रोखठोक इशारा जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक व आमदार विनय कोरे यांनी मिरजेत दिला.

जनसुराज्य शक्ती पक्षाचा युवा व कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा तसेच पक्ष प्रवेश कार्यक्रमात आमदार कोरे (Vinay Kore) बोलत होते. या वेळी युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, गोकुळ दूध संघाचे संचालक अमर पाटील, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने, कोल्हापूर मार्केट कमिटीचे सभापती शंकर बारगीर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vinay Kore
Hatkanangle Loksabha Constituency : हातकणंगलेत महायुतीने पुढे आणला नवा चेहरा; 'या' नावांची चाचपणी

आमदार कोरे म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राज्यातील नेत्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की, जनसुराज्य शक्तीसारखा पक्ष (Jansuraj Shakti Party) केंद्रात मित्रपक्ष म्हणून केंद्राच्या धोरणांना पाठिंबा देतो, तेव्हा विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने मित्राची भूमिका मोठ्या भावाप्रमाणे निभावली पाहिजे, आज जनसुराज्य पक्ष देशाच्या विकासाचा, लोकशाहीच्या पावित्र्याचा विचार करतो. केंद्र सरकारच्या विचारांचा पुरस्कार करतो. अशा पक्षाने विधानसभा निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाला सन्मानजनक जागा सोडाव्या लागतील आणि आमच्या भावना मी उघडपणे मिरजेच्या व्यासपीठावरून त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय.

मिरजेसारखा मतदारसंघ, कोल्हापूर जिल्ह्यातील आमची ताकद असणारे मतदारसंघ, सोलापूर जिल्ह्यात तसेच मराठवाड्यातीलही काही मतदारसंघात, तसेच नाशिकच्या मालेगावमध्ये आमचे आमदार होते. अशी काही ताकत असणारे जे मतदारसंघ आहेत. जिथे जनसुराज शक्ती पक्षाचे कार्यकर्ते ताकदीने काही विचार या राज्याला देऊ शकतात, त्या जागा या पक्षाला त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजेत. ही आग्रहाची मागणी आहे.

Vinay Kore
Shinde comment on BJP Candidate : भाजप सोलापूरसाठी एखादा छुपा रुस्तम उमेदवार काढेल; सुशीलकुमार शिंदेंचा टोला

सामान्य माणसांच्या माध्यमातून असामान्य राजकीय नेता उभा करायचा, जो हा विचार स्वराज्याच्या माध्यमातून आपण घेऊन निघालोय. त्या विश्वासाने तुम्ही सगळी मंडळी या प्रवाहात आलाय, यातून निश्चितपणाने एक मोठी सामान्यांची शक्ती आपण सगळेजण निर्माण करू या. मी जरी या पक्षाचा प्रमुख असलो, तर प्रामुख्याने मी सातत्याने सांगतोय की संस्कार, संकल्प आणि सिद्धी, ओळख नव्या महाराष्ट्राची हा विचार आपण सगळ्यांनी संघटित शक्तीच्या माध्यमातून मांडायचा प्रयत्न करूया.

Vinay Kore
Babasaheb Deshmukh Next MLA : सांगोल्याचे पुढचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख असतील; रोहित पवारांचे भाकित

पक्षापेक्षा आपल्या सगळ्यांच्या या शक्तीला, गुलालाच्या मुठीला आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातल्या प्रगतीच्या लोकशाहीचे पावित्र्य लागण्याचे साधन आपण बनवायचे आहे. ते बनवण्याचे काम आपल्या सगळ्यांच्या हातून उद्याच्या काळामध्ये घडावे, अशी अपेक्षाही आमदार कोरे यांनी व्यक्त केली.

समित कदम म्हणाले, आपला पक्ष हातकणंगले, कोल्हापुरात करवीरमध्ये नव्याने ताकद वाढवत आहे. भविष्यामध्ये आपण सांगली जिल्ह्याकडे ताकदीने कसं लक्ष दिले जाईल, ही सगळ्याच कार्यकर्त्यांची आपल्याकडे मागणी राहील.

Edited By : Vijay Dudhale

R

Vinay Kore
Tanaji Sawant News : तानाजी सावंतांची बेताल वक्तव्ये महायुतीला अडचणीत आणणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com