Ram Satpute News : सातपुतेंचा एक फोन अन् फडणवीसांचे गुन्हे मागे घेण्याबाबतचे आश्वासन...

Ram Satpute On Devendra Fadnavis : फडणवीस आणि सातपुतेंच्या फोनवरील संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
ram satpute call devendra fadnavis
ram satpute call devendra fadnavissarkarnama
Published on
Updated on

भाजपनं सोलापूर मतदारसंघातून विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर स्वामी ( Jay Siddheshwar Swami ) यांचं तिकीट कापून माळशिरसचे आमदार राम सातपुते ( Ram Satpute ) यांना उमेदवारी दिली आहे. राम सातपुते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांचे विश्वासू समजले जातात. आता एका प्रश्नासाठी सातपुतेंनी फडणवीसांना फोन केला होता. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया तपासून तो प्रश्न मार्गी लावण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासन फडणवीसांनी सातपुतेंना दिलं. फडणवीस आणि सातपुतेंच्या फोनवरील संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

कोरोना काळात मोची समाजातील नेते करण म्हेत्रे यांचा मृत्यू झाला होता. करण म्हेत्रे यांच्या अंत्यसंस्काराला मोची समाजातील तरूण मुले, महिला आणि पुरुषांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता. कोरोन नियमावली पायदळी तुडवली आणि जाणूनबुजून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सोलापूर शहर पोलिसांनी जवळपास अडीचशे लोकांवर भा.द.वि 353 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हे गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी घेऊन शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्ता ज्योती वाघमारे आणि मोची समाजाती कार्यकर्ते भाजप उमेदवार राम सातपुतेंकडे ( Ram Satpute ) गेले. तेव्हा, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीसांकडे आमची कैफियत मांडा, अशी मागणी मोची समाजाकडून सातपुतेंकडे करण्यात आली. तेव्हा सातपुतेंनी थेट गृहमंत्री फडणवीसांना ( Devendra Fadnavis ) फोन करून गुन्हे मागे घेण्याची विनंती केली. गृहमंत्री फडणवीसांनी गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन दिलं.

ram satpute call devendra fadnavis
Ram Satpute Vs Praniti Shinde : प्रणिती शिंदेंच्या भिडण्याच्या आव्हानाला राम सातपुतेंनी हात जोडले

सातपुते अन् फडणवीसांमध्ये नक्की संवाद काय?

सातपुते - हॅलो, भाऊ नमस्ते, माझ्याकडे मोची समाजातील बांधव आले आहेत. कोरोनात करण म्हेत्रे यांचं निधन झालं. पण, काँग्रेसचं सरकार असताना अडीचशे जणांवर 353 नुसार गुन्हा दाखल केले आहेत. ते गुन्हे मागे घेण्यात यावे, ही विनंती आहे...

फडणवीस - काढून टाकू ना! 100 टक्के काढून टाकू... त्यासाठी थोडी प्रोसेस करावी लागेल. पण, ती प्रोसेस आपण करून घेऊ...

ram satpute call devendra fadnavis
Ram Satpute: हेच हिंदूंना दहशतवादी म्हटलेले अन् आता..., सातपुतेंचा प्रणिती शिंदेंवर हल्लाबोल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com