Kolhapur Political News : कोल्हापूर लोकसभा निवडणूक ( Kolhapur Lok Sabha Election 2024 ) हळूहळू रंगात येऊ लागली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून विविध जोडण्या केल्या जात आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये अनेक नाराज कार्यकर्त्यांना एकमेकांकडे ओढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
कोल्हापूर (Kolhapur )उत्तर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून आता मोठा मास्टरप्लॅन आखला जात असून, तटबंदी भक्कम केली आहे. महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक ( Sanjay Mandlik ) यांना शहरातील 105 माजी नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे.
भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या 105 माजी नगरसेवकांची महायुतीचे उमेदवार खासदार प्रा. संजय मंडलिक ( Sanjay Mandlik ) यांच्यासोबत बैठक झाली.
या वेळी नगरसेवकांनी प्रचारात उतरण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्यामुळे महायुती अधिक बळकट झाली असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ), खासदार धनंजय महाडिक ( Dhananjay Mahadik ) आणि प्रा. जयंत पाटील यांनी सांगितले. कोल्हापूर येथील हॉटेल थ्री लिव्हजमधील या माजी नगरसेवकांची बैठक झाली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
खासदार महाडिक म्हणाले, "या 105 माजी नगरसेवक आणि बारा माजी महापौरांमुळे महायुतीला मोठी ताकद मिळाली आहे. निवडणूक आली की, विरोधक भावनिक मुद्देबाहेर काढतात. आतादेखील तेच सुरू आहे."
शहराला मिळणार एक हजार कोटी
"घनकचरा, पंचगंगा प्रदूषण, आदी स्वरूपातील शहराचे जटील प्रश्न कायम आहेत. ते सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत चर्चा झाली आहे. त्यांनी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर एक हजार कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे मान्य केले आहे. त्याने कोल्हापूरचा चेहरामोहरा बदलणार आहे," असं पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.