Lok Sabha Election 2024 : कोल्हापुरात मोदींची सभा जोरदार, पण शाहू महाराजांवर थेट टीका करणे टाळले...

Kolhapur Political News : महाराणी ताराराणींच्या भूमीत काँग्रेसचे युवराज (राहुल गांधी) शक्तीचा विनाश करण्याची गोष्ट करतात.
Kolhapur Political News
Kolhapur Political NewsLok Sabha Election 2024

Kolhapur News : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तप्त झाले आहे. आज महायुतीकडून असलेले शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्यासाठी पंतप्रधान मोदींनी सभा घेतली. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाषण केले. मात्र, या महायुतीच्या संपूर्ण सभेत प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांच्यावर एकदाही थेट टीका केली गेली नाही. (Latets Marathi News)

या वेळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी खासदार राहुल गांधी आणि ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसेच त्यांनी शिवसेनेचे उमेदवार मंडलिक आणि माने यांना निवडून देण्याचं आवाहन केलं. मात्र, संपूर्ण भाषणात एकदाही त्यांनी शाहू महाराजांचा उल्लेख केला नाही की त्यांच्यावर टीका केली नाही. यामुळे प्रचार सभेत विरोधी उमेदवारावर भाष्यच झाले नसल्याने ही बाब विशेष लक्षवेधी ठरली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Kolhapur Political News
Sanjay Raut: ...म्हणून मोदी-शाह महाराष्ट्राला घाबरतात, संजय राऊतांचा हल्लाबोल

मोदींनीही शाहू महाराजांचा थेट उल्लेख टाळला -

मोदींनी आज कोल्हापुरात सभा घेतली. आज नारी शक्ती मोदींची सुरक्षा कवच बनून उभी आहे, तेव्हा काँग्रेसवाल्यांचा त्रास चांगलाच वाढला आहे. तुम्ही विसरू नका महाराणी ताराराणींच्या भूमीत काँग्रेसचे युवराज (राहुल गांधी) शक्तीचा विनाश करण्याची गोष्ट करतात. कोल्हापूर विकासाची आणि वारसा असलेली भूमी आहे. भावनांनी भरलेलं क्षेत्र आहे. पण इंडिया आघाडीच्या लोकांनी या भूमीची उपेक्षा केली आहे. आज मात्र केंद्र आणि शिंदे-फडणवीस-पवार सरकार कोल्हापूरच्या विकासासाठी काम करत आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. मात्र शाहू महाराजांचा उल्लेख करणे मोदींनी जाणीवपूर्वक टाळले.

Kolhapur Political News
Abhijeet Patil Way On the BJP : शरद पवारांना सोलापुरात पुन्हा धक्का; विश्वासू नेते अभिजित पाटील भाजपच्या वाटेवर?
Kolhapur Political News
Sharad Pawar NCP Manifesto 2024: गॅस 500 रुपयांपर्यंत करणार, शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोग; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा शपथनामा

शाहू महाराजांवर टीका का नाही?

शाहू महाराज (Shahu Maharaj) हे कोल्हापूर गादीचे राजे आहेत. त्यांच्याविषयी कोल्हापूरच्या जनतेमध्ये आणि एकूणच महाराष्ट्र अन् देशाचं एक आदराची भावना आहे. शिवसेना उमेदवार संजय मंडलिक यांनी काही दिवसांपूर्वी शाहू महाराजांवर वंशजाच्या संदर्भात टीका केली होती. त्यामुळे त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार आगपाखड केली होती. त्यामुळे महाराजांवर आणखी टीका करून नाराजी आणि वाद ओढवून घेण्याचे मोदींसह महायुतीच्या नेत्यांनी जाणीवपूर्वक टाळले.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com