Lok Sabha Election 2024 : मविआला 'तो' आरोप पडणार महागात; मंडलिकांच्या कारखान्याने बजावली नोटीस

kolhapur Lok Sabha Election 2024 : कोल्हापूर निवडणूक जसं जसं शेवटच्या टप्प्यात येत आहेत, तसं आरोप-प्रत्यारोपांमध्ये वाढ झाली आहे.
sadashivrao mandlik sakhar karkhana
sadashivrao mandlik sakhar karkhana sarkarnama

Kolhapur News : महाविकास आघाडीच्या ( Mahavikas Aghadi ) प्रचारार्थ मेळाव्यात मिरजकर तिकटी येथे झालेल्या माजी नगरसेविका भारती पाेवार यांचे विधान महागात पडण्याची चिन्हे आहेत. महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक ( Sanjay Mandlik ) यांच्यावर आरोप करत असताना कागल तालुक्यातील हमीदवाडा सहकारी साखर कारखाना कर्नाटकमध्ये विकला असल्याचा आरोप भारती पाेवार यांनी केला होता. त्यावर कारखान्याच्या संचालक मंडळाने पत्रकार परिषद घेत त्याचा निषेध केला होता. आता कारखाना संचालक मंडळाने भारती पाेवार यांना नोटीस बजावली आहे.

हमीदवाडा येथील सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखाना कर्नाटकातील एका नेत्याला विकल्याचा गंभीर आरोप करणाऱ्या भारती पोवार यांना कारखाना प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. पोवार यांनी नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत जाहीर माफी मागावी, अन्यथा फौजदारी खटला अथवा नुकसानभरपाईचा दावा दाखल करू, असा इशारा देण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) पार्श्वूमीवर काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती ( Shahu Maharaj Chhatrapati ) यांच्या प्रचारार्थ 21 एप्रिल रोजी कोल्हापुरात मिरजकर तिकटी चौकात झालेल्या जाहीर सभेत भारती पोवार यांनी हमीदवाडा कारखाना कर्नाटकातील एका नेत्याला विकल्याचा आरोप केला होता. त्यानंतर कारखान्याचे संचालक मंडळ व प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घेत पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या या वक्तव्याचा निषेध केला.

sadashivrao mandlik sakhar karkhana
Kolhapur Lok Sabha Election 2024 : बळ समान, कुणाला मिळणार विजयाचा मान; दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट

भारती पोवार यांनी केलेली विधाने चुकीची, बिनबुडाची आहेत. या विधानातून त्यांचा कारखान्याची नाहक बदनामी करण्याचा हेतू स्पष्ट होत असून, यामुळे कारखान्याच्या प्रतिष्ठेस धक्का बसला आहे. पोवार यांच्या या विधानाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली. त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची प्रक्रिया म्हणून ही नोटीस देण्यात आल्याचे कारखाना प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

( Edited By : Akshay Sabale )

R

sadashivrao mandlik sakhar karkhana
Lok Sabha Election 2024 : हातकणंगलेत जातीय समीकरणेच ठरणार 'गेमचेंजर'; आजी-माजी खासदार की नव्याला मिळणार संधी?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com